बंडातात्या कराडकर यांना हवंय तरी काय?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

ह भ प बंडातात्या कराडकर यांना हवंय तरी काय..
आज महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीच्या निमित्ताने ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी पायी वारी जाण्यासाठी आग्रह धरलेला आहे.

या आग्रहामुळे पुन्हा एकदा त्यांचे नाव चर्चेत आले आहे. यामुळे काही राजकीय, पुरोगामी व विरोधी बंडातात्या कराडकर यांना अनेक दूषणे देण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्यासाठी…
बंडातात्या कराडकर हे व्यक्तिमत्व कधीही जातपात न मानता, मानवता धर्म जोपासणारे संप्रदायातील स्वतंत्र विचारांचे, बंडखोर नेतृत्व आहे आपल्या मनाला जे पटतं, जे संप्रदायाच्या हिताचे आहे या गोष्टी कोणताही विचार न करता, कोणत्याही टिकेला व बदनामीला न घाबरता ते थेट व्यक्त करीत असतात आणि तो त्यांचा स्वभाव आहे.
बंडातात्या कराडकर हे ब्रम्हचारी असून त्यांनी संप्रदायाच्या नावावर कुठे आलिशान बंगला उभा केला नाही किंवा आलिशान गाडीतून फिरून कीर्तनाचा बाजार मांडला नाही. कीर्तनाची किंमत कधी ठरविली नाही. पद्म पुरस्कारासह अनेक देवू केलेले पुरस्कारही नम्रपणे नाकारले आहेत.


ज्ञानेश्वरी,तुकोबारायांचा गाथा मुखोद्गगत आहे. भागवत, रामायण, महाभारत यांचाही प्रचंड अभ्यास आहे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महाराणा प्रताप यांचेसह अनेक महापुरुषांच्या ऐतिहासिक परंपरा आणि ईतिहास सनावळ्यांसह पाठ आहेत.
गोवंश वाचावा, वाढावा यासाठी सातत्याने समाजात प्रबोधन,निर्व्यसनी युवकांचे मोठे संघटन करून व्यसनाच्या खाईत बुडणार्‍या देशातील युवा पिढीला वाचविण्यासाठी प्रामाणिक व
राष्ट्रप्रेमी युवकांच्या संघटनातून व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना केली आहे.
कार्यकर्त्यांच्या श्रमातून उभे राहिलेले राष्ट्रबंधु राजीव दीक्षीत गुरूकुल पिंपरद मधे असून १५० हून अधिक विद्यार्थी शालेय व आध्यात्मिक शिक्षण घेत आहेत.
शेकडो युवकांना मार्गदर्शन करून सेंद्रिय शेती,सेंद्रिय उत्पादने बनविणे तसेच अनेक रोजगार निर्मितीतून उद्योजक बनविले आहे.


बंडातात्या कराडकर यांनी केलेली काही आंदोलने….
१)बारावीच्या पेपर मध्ये जगद्गुरू तुकोबाराय यांची बदनामी करणारा मजकूर छापल्याबद्दल तत्कालीन बोर्डाच्या अध्यक्षांना केलेली मारहाण…
२)गोवंश हत्या बंदी कायदा मंजूर व्हावा यासाठी पंढरपूर मध्ये मुख्यमंत्र्यांना अडविण्याचे आंदोलन….
३)संत भूमीत होऊ घातलेली डाऊ केमिकल कंपनी या देशविघातक कंपनीला हद्दपार करण्यासाठी केलेले आंदोलन…..
४) पंढरपूर संस्थान वर वारकरी संप्रदायातील व्यक्तीच अध्यक्षपदी असावा यासाठी केलेला संघर्ष
अशी अनेक आंदोलने पहाता आदरणिय तात्या मॅनेज झाले असते तर……!


कोट्यावधी रूपयांचे घबाड मिळवू शकले असते…
स्वतःला कोणतेही पद मिळवू शकले असते…..
पण याची गरजच त्यांना नाही.
असली पदे व प्रतिष्ठेला लाथ मारणार्‍या तात्यांना प्रसिध्दीचे आरोप लावणार्‍या महाभागांनी समजून घ्यावे.
तत्कालीन संत महात्म्यांवर सुध्दा समाजाने टिकेची झोड उठविली म्हणून त्यांनी कार्य सोडले नाही. आदरणिय तात्याही ते सोडणार नाहीत.


नाही तरी तात्यांना हवय तरी काय?
दोन चुरगळलेले पोशाख, रोजची देवपुजा,मिळेल ते खाणे,डोंगरावर फिरणे आणि झोपण्याची वळकटी या पलिकडे त्यांचा कोणताही बॅंक बॅलन्सही नाही.
वारकरी संप्रदायात निष्ठेला व श्रध्देला महत्व आहे…
वारीसाठी कोणालाही निमंत्रण नसते मागे पुढे उभा राहे सांभाळीत।आलीया आघात निवाराया।। या संतवचनावर ज्यांचा पूर्ण विश्वास आहे..पायी वारीची परंपरा खंडीत होवू नये असे ज्यांना वाटते त्यांनीच पायी वारीसाठी यावे.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇