२८०७, अभंग :- बोलिलिया गुणीं नाहीं पाविजेत । देवा नाहीं होत हित तेथें :- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२८०७
बोलिलिया गुणीं नाहीं पाविजेत । देवा नाहीं होत हित तेथें ॥१॥
कवतुक तुझें न कळे यापरि । घेसील तें शिरीं काय नव्हे ॥ध्रु.॥
नाहीं मिळे येत संताचिया मता । पुराणीं पाहतां अघटित ॥२॥
तुका म्हणे पायीं निरोपिला भाव । न्याल तैसा जाव सिद्धी देवा ॥३॥

अर्थ

देवा मी तुम्हाला माझे अवगुण सांगितलेलेच आहे त्या अवगुणांमुळे माझे हित कसे होणार ? देवा अरे तुझे कौतुक कोणालाही कळणार नाही कळतही नाही आमचे हित करणे हे जर तू तुझ्या माथ्यावर घेतले तर तू काय करु शकत नाहीस ? देवा आपले पूर्वपुण्य जर चांगले असेल तर आम्हाला तुझी प्राप्ती होईल, या संतांच्या मताला मी सहमत नाही कारण पुराण उघडून पाहिले तर सर्व अघटितच प्रकार लक्षात येतात तू यापूर्वी अशा काही भक्तांचा उध्दार केला आहे म्हणजे वाल्मिक अजामेळ गणिका असे काही भक्त तुझे झालेत की त्यांचे पूर्वपुण्य चांगले नव्हते तरी देखील त्यांना तुझी प्राप्ती झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता मी माझा भक्तीभाव जसा आहे तसा तुमच्या पायाजवळ निरुपण केला आहे आता माझा भक्तीभाव जसा सिध्दीला जाईल तसा जावो.”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *