ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.729

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२९  .

अंतरीच्या सुखा नाहीं पैं मर्यादा । यापरी अगाधा होउनी खोल ॥१॥ तेथें गोविंदु अवघाची जाला । विश्व व्यापूनिया उरला असे ॥२॥ बाह्यअभ्यंतरीं नाहीं आपपर । सर्व निरंतर नारायण ॥३॥ मीपण माझें न देखे दुजें । ज्ञानदेवो म्हणे ऐसें केलें निवृत्तिराजें ॥४॥

अर्थ:-

मन बुद्धि आदि च्या आंत असणारा जो आत्मा त्याच्या सुखाला मर्यादा नाही. याप्रमाणे जो समजण्यास अत्यंत कठीण तो गोविंदरूप होऊन विश्व व्यापूनही उरला. आता त्याचे ठिकाणी बाह्य नाही व अंतरही नाही आपपरभाव नसून निरंतर नारायण स्वरूप आहे. माझ्या निवृत्तिरायांनी माझ्याठिकाणचा आपपरभाव नाहीसा करून टाकला. त्यामुळे मला या जगांत त्या परमात्म्याशिवाय दुसरे काही एक दिसत नाही. असे माऊली सांगतात

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *