ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.664

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६६४

योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहता पाहता मना न पुरे धणी । । १ । ।देखिला देखिला मायें देवांचा देवो । फिटला संदेहो निमालें दुजेंपण । । २ । ।अनंतरुपें अनंतवेषें देखिलें मी त्यासी । बाखरखुमादेवीवरु खूण बाणली कैसी । । ३ ।

अर्थ:-

योगिजनांना दुर्मिळ असे पांडुरंगाचे दर्शन मला झाले आणि ते किती पाहिले तरीही मनाची तृप्तता होत नाही. हा देवांचा देव विठ्ठल मी पाहिला आणि मनातील सर्व संदेह संपले व मी माझे मन इतके त्याच्या ठिकाणी तद्रूप झाले की काही द्वैत उरलें नाही. पांडुरंगाची अनंत वेषातील अनंत रुपें मी पाहिली आणि तल्लीनतेने मनोमन एकात्म रुपाची खुणगाठ पटली.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *