ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.500

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५००

सिद्धांतीचे सार आत्मा सदोदित । माया ते कल्पित तद्विवर्त ॥१॥ शीव पूर्ण जीव भक्त अविद्यक । होय पूर्ण चोख आत्मज्ञानें ॥२॥ प्रपंच कल्पिक प्रकृति उपाधि । ईश्वरतत्त्व बुद्धि पारमार्था ॥३॥ ब्रह्म अगोचर म्हणे ज्ञानेश्वर । नाथिला संसार मूळी नाही ॥४॥

अर्थ:-

वेदांत सिद्धांताचे हे सार आहे की आत्मा नित्य असून, माया कल्पित आहे. व जगत त्याचा विवर्त म्हणजे मिथ्या आहे. शिव म्हणजे परिपूर्ण ईश्वर व त्याचा भक्त जीव हे दोन्ही अविद्या कार्य आहेत म्हणजे तिच्या स्थिती आधीन यांची स्थिती आहे. हे शुद्ध आत्मज्ञानाने स्पष्ट समजते. या कल्पित प्रपंचाची उपाधि प्रकृति होय व याच उपाधिमुळे परमात्म्याला ईश्वरत्व येते. व त्याच्याच प्रसादाने बुद्धि परमार्थाला योग्य होते. ब्रह्म हे ज्ञानाचा विषय नसून हे भासमान पण नष्ट होणारे जगत कधी झालेच नाही. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *