ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.463

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४६३

शरीर हें स्थळ । मळानिर्मळाचें मूळ । पाहोनी चौखाळ । आदिपुरुषासी ॥१॥ जन्ममरणाच्या उचटूनि पेडी । मग ये बिंवडी ज्ञान पिकें ॥२॥ पंढरीचे पीक न समाये अंबरी । तें शेत सोकरी पुंडलिकु ॥३॥ ऐहिक्य परत्र दोन्ही शेतांचीं आउते । मुंड मुंड तेथें कुळवाडिये ॥४॥ उचलूनि पेंडी कासिया समूळीं । मग पुण्यकाळी ओलवले ॥५॥ गरुडटके दोन्ही शेताची बुजावणी । दश कुडपणीं नामघोष ॥६॥ एकवीस स्वर्गाचा घालूनियां माळा । मग ते गोपाळामाजी खेळे ॥७॥ जये शेती निवृत्ती भीतरे । तये शेती साजे पुरे । राऊळी निदसुरे दंडि जती ॥८॥ रात्री दिवस तुम्ही हरिचरणीं जागा । तेणे तराल गा भवसागरु ॥९॥ अठराही बलौतें तें केले धडौतें । खळें दान देते सनकादिकां ॥१०॥ ज्ञानदेव म्हणे जगदानी पिकला । पुरोन उरला पंढरिये ॥११॥

अर्थ:-

शरीर हे स्थळ म्हणजे क्षेत्र, किंवा मळा म्हणजे जन्मरणादि दुःखरुपी संसाराचे तसेच निर्मळाचे म्हणजे मोक्षाचे अशी दोन्ही पिके करण्याचे मूळ म्हणजे क्षेत्र आहे त्यात शुध्द जो परमात्मा त्यास पाहिल्याने जन्ममरणाच्या मुळ्या, खोडे काढुन टाकून अशी ती जमीन बिवड केली असल्यामुळे त्या जमिनीत ब्रह्माचे पीक आले. असे ते पीक पंढरपूरात आले त्याचा काय नवलाव सांगावा ते आकाशात मावेनासे झाले. अशा सगळ्या शेतांची पिके नवलावा सांगावा ते आकाशात मावेनासे झाले. अशी शेतीची पिके गोळा करणारा पुंडलिक आहे. ऐहिक परत्र ही दोन्ही शेतांची औते आहेत.त्या औतांच्या साधनाने गरीब लोक शेती करणारे शेतकरी आहेत ? शेतातील निषिद्ध कर्माच्या वासना ह्याच कोणी त्या मुळा सकट काढुन शरीररुपी क्षेत्र स्वच्छ केल्यावर पुण्य कर्माच्या काळी ते चांगले ओलावले. संताच्या दिंडीत गरुडटके असतात. हीच कोणी त्या शेतांची बुजगावणी केली. संताचा जो नामघोष हीच कोणी दशदिशांची कुडपणी/ कुंपण होय. एकवीस स्वर्गाची माळा घातलेला परमात्मा वैष्णवांत खेळत आहे शरीररुपी शेतांत निवृत्ति अंतर्मुखता आहे. तेथे धान्याची रासरुपी शेतात परिपूर्ण आहे. शेताचे काम न करता स्वस्थ निजणारे जे घरांतआहेत. त्यांना दंड केला जातो. म्हणून तुम्ही रात्रंदिवस हरीचरणाचे ठिकाणी जागे राहा त्याने भवसागर तराल हो ! अशा तुमच्या भक्तीमुळे अठरा पुराणे हेच कोणी बलुतेदार संतोषतील. तसेच तुम्ही भक्ती करा असे दान मागण्यास आलेले सनकादिक हेही संतुष्ट होतील. सर्वाच्या इच्छेप्रमाणे दान देणारा एकच श्री पांडुरंगराय असून तो पंढरीस भक्तासांठी शिल्लक राहिला आहे. असे

निवृत्तीदास माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *