ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.438

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४३८

मीच माझा डोळा मीच शून्यांत निळा । माझा मी वेगळा तयामध्ये ॥१॥ उफराटी दृष्टी लावितां नयनीं । ते दृष्टीची वाणी किंचित् ऐका ॥२॥ उफराटी दृष्टी देखे उन्मनीवरी । तेंव्हा निर्विकारी मीच मग ॥३॥ ज्ञानदेव म्हणे देहा डोळा दिठी । पाहता सर्व सृष्टि निवृत्ती एका ॥४॥

अर्थ:-

मी माझा आत्मरूप डोळा असून नीलवर्ण ज्योतीत दिसणारे शून्यही मीच होय सर्वत्र असलो तरी मी वेगळा आहे. या वस्तुचा माझा बिलकुल संबंध नाही एवढेच नव्हे तर त्या वस्तु मजवर आहेत की नाही याची मला शुद्धीही नाही.बाह्य विषयाकडे धावणारी तुमची दृष्टी जर उफराटी वळवून अंतर्मुख केली तर काय होईल गोष्ट जरा ऐका. या अंतर्मुख दृष्टीने उन्मनी अवस्था प्राप्त होऊन मीच सर्वत्र आहे असे दिसेल. अशा अंतर्मुख देह डोळा दृष्टीने देह डोळा दृष्टी वगैरेकडे पाहाल तर सर्व सृष्टीची निवृत्ती म्हणजे

मिथ्यात्व निश्चय होईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *