ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.371

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३७१

नयनाचें अंजन मनाचे रंजन । ठसा हा सघन बाईयांनो ॥१॥ ॐकार अक्षर अक्षरीं हारपे । अनुभवाच्या मापें मोजूं बापा ॥२॥ बिंदूचें जें मूळ प्रणवाचें फळ । योगियाचे खेळ तेच ठायीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तिप्रसादें । स्वरूपाच्या विनोदें बोलिलें हें ॥४॥

अर्थ:-

ओकांराचे ध्यान हे मनोरंजन अशी दिव्य दृष्टी देणारे अंजन आहे त्यामुळे ब्रह्मस्वरूप ज्ञानाचा अंतःकरणात ठसा उमटतो. व त्यामुळे जगातील सर्व वस्तुंचा विसर पडतो.ध्यानाची ध्यान हे मनोरंजक अशी दिव्य दृष्टी देणारे अंजन आहे. त्यामुळे प जानाचा अंतःकरणात ठसा उमटतो. व त्यामुळे जगातील सर्व वस्तूचा पडतो. ध्यानाची परिपक्व अवस्था झाली की ध्येय, ध्याता व ध्यान ही त्रिपुटी त्यात नाहीसी होऊन जाते. याचा अनुभव ज्याचा त्यांनी पाहून घ्यावा.या योगाने ब्रह्मप्राप्ती होणे हेच योगी लोकांच्या कष्टाचे फल होय. निवृत्तीरायांच्या कृपाप्रसादाने मी ह्या ब्रह्मस्वरूप अवस्थेच्या गोष्टी सहज विनोदाने वर्णन करून गेलो. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *