सात वारांची निर्मिती कशी झाली ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇


आठवड्यातील सात वारांची निर्मिती कशी झाली व का? वाराची देवता कोणती ..

आपण युगानुयुगे वर्षानुवर्षे
रवि,सोम,मंगळ अशा सात
वारांशिवाय कोणत्याही प्रकारचा व्यवहार करत
नाही. यांच्याशिवाय कसलाही व्यवहार होणे अशक्य आहे.
राजा परिक्षिताला शाप मिळाला की या सात
दिवसात एक दिवस तुझा मृत्यु निश्चित आहे. आणि प्रत्येक मनुष्याचा देखील
जन्म व मृत्यूचा एक वार निश्चित आहे. एकंदरीत काय तर संपूर्ण विश्वच या सात वारांवरअवलंबून आहे. असे असताना आपण कधी
असा विचार केला का ? तो
म्हणजे या सात वारांची निर्मिती झाली कशी? व
ती कोणी केली?


ज्याच्याशिवाय आपले व्यवहार चालूच शकत नाहीत त्याची दखल घेणे आपले आद्य कर्तव्य आहे.ज्ञानरूपी प्रकाशाशिवाय
अज्ञानरूपी अंधार नाहीसाहोत नाही म्हणून हा लेखप्रपंच.
आज बहुतांशी समाज आपल्या वेद ,शास्त्र,पुराणांना थोतांड समजणारा आहे. शिवाय देव व धर्माला न मानणारा आहे. पण
आपल्याला ठाऊक आहे का या सात वारांचा निर्मिता कोण आहे ते?
स्रुष्टिचा आरंभ होत असताना भगवान शंकरानी समस्त लोककल्याणासाठी या
वारांची कल्पना केली.थोडक्यात सांगायचे झाले
तर भगवान शंकर संसाररूपी रोगाचा नाश करणारे वैद्य आहेत. तसेच औषधांचे ही औषध आहेत.
भगवान शंकरांनी सात देवतांच्या नावांनी वारांची कल्पना केली व त्या प्रत्येक वाराचा स्वामी म्हणून ग्रहांची योजना केली. ते पुढीलप्रमाणे..
शिवपुराणानुसार….


देवता शंकर — स्वामी सूर्य
वार : रविवार
आरोग्य प्राप्ती
देवता मायाशक्ति – स्वामी चन्द्रमा
वार : सोमवार
सम्पत्तिप्राप्ति
देवता कुमार कार्तिकेय
स्वामी — मंगळ वार मंगळवार
व्याधिनिवारण
देवता भगवान विष्णु


स्वामी बुध वार बुधवार
पुष्टिवर्धक
देवता ब्रह्मदेव
स्वामी बृहस्पति
वार गुरुवार
आयुष्यवृद्धी
देवता इन्द्र
स्वामी शुक्र
वार शुक्रवार


भोगदायक
देवता यम
स्वामी शनैश्चर
वार शनिवार
मृत्युचे निवारण
अशाप्रकारे शिवपुराणानुसार सात वारांची सृष्टीच्या हितासाठी भगवान शंकरांनी निर्मिती केली.
म्हणून आपल्या धर्मात देवता व ग्रहांना विशेष स्थान आहे.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *