ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.933

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके पाईक अभंग ९३३

जालोनी पाइकें गोवीपण जिंकें । परी स्वामीया सेवक साचा होय ॥ एक एकेविणें स्वामी सेवकपण । मिरविती हे खूण स्वामी जाणे ॥१॥ पाईक काय स्वामी स्वामिया काय पाईक । असतां एके एक दोन्ही नव्हती ॥धृ॥ स्वामीचें काज पाईकपणे वोज । करिसां होय चोज पै गा ॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलासी बोळगतां । पाईका स्वामी असतां निवृत्ति ऐसा ॥२॥

अर्थ:-

पाईक म्हणजे सेवक होऊन स्वामीपणा प्राप्त करून घेतो. तथापि स्वामी आणि सेवक हा भाव कायम राहतोच. स्वामीपणा किंवा सेवकपणा हे सापेक्ष आहेत. म्हणजे स्वामीपणा असला तरच सेवकपणा असणार, आणि सेवकपणा असेल तरच स्वामीचे स्वामीपण, पण ऐक्य भावाचा निश्चय होऊन देव भक्तांमध्ये स्वामीसेवकपणा कसा नांदत आहे याची खूण देवच जाणतो.लौकिकदृष्ट्या विचार केला तर सेवक काय स्वामी होईल? कां स्वामी सेवक होईल? दोघामध्ये ऐक्य निश्चित झाले असतां स्वामी सेवकपणा हा द्वैतभाव राहात नाही. धन्याचे काम सेवकपणा पत्करून चांगले केले असतां त्याचे कौतुकच होते. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांना भजले असता पाईक जपाईकपणाने असला तरी माझे मालक निवृत्तीराय आहेत. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *