ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.698

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६९८

साता व्योमापरतें पाहों गेलें । तंव पाहाणेचि जालें ब्रह्म उदधी ॥१॥ साट मोट माझी मोट बांधिली । नेऊनि टाकिली निर्गुणी गे माये ॥२॥ बापरखुमादेविवरू पंचविसावा देखिला । तोही खुंटला तये पंथीं ॥३

अर्थ:-

॥ ज्ञानसाधने पंचज्ञानेंद्रिये मन व बुद्धि मिळून असणारे सात हेच कोणी व्योम म्हणजे आकाश अशी कल्पना करून त्याच्यापलीकडे असणाऱ्या ब्रह्मस्वरूप समुद्राला पाहू गेले. तो मी ब्रह्मसमुद्रच होऊन राहिले. साट मोट म्हणजे सर्व अनात्मपदार्थाचे गाठोडे बांधून त्या निर्गुण ब्रह्मस्वरूपांत नेऊन टाकली.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल सांख्यांच्या चोवीस तत्त्वांहून निराळे

असणारे, जो आत्मा तोही त्या विठ्ठलस्वरूपांत बुडाला. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *