ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.467

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४६७

पातेजोनि खेवासी आणिलें । येणें आपणिया समान मज केले गे माये ॥१॥ पाहें पा नवल कैसें वितलें । मन उन्मनी उन्मन ग्रासिलें ॥२॥ पाहें पा येणे रखुमादेविवरा विठ्ठलें । पाहे पा राहणे पंढरपुरी केलें ॥३॥

अर्थ:-

भगवान श्रीकृष्णाला अलिंगन देण्याकरीता जवळ केले व त्याला आदराने आलिंगन दिल्याबरोबर मला त्याने आपल्या सारखे करून टाकले.पहा, काय चमत्कार झाला. उन्मन जो परमात्मा त्या परमात्मस्वरूपाशी माझ्या मनाचा ग्रास करून ते उन्मन झाले.पहा, या रखुमादेविच्या पती श्रीविठ्ठलाने आपल्या स्वरूपाशी ऐक्य केल्यामुळे माझे राहाणे आपोआप पंढरपूरास झाले, असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *