ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.456

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४५६

क्षीरसागरीचें निजरूपडें । पाहतां पारखिया त्रिभुवनीं न संपडे । तें उभे आहे वाडेकोडें । पुंडलिकाचे आवडी ॥१॥ मेघश्याम घेऊनियां बुंथी । जयांते श्रुती पै वानिती । कीं तें पुराणासी वाडे । तें पंढरिये उभे असे कानडें गे माये । आवडीच्या वालभें गोजावलें गोजिरें । पाहतां साजिरे त्रिभुवना एक गे माये ॥३॥ जे सकळ मंगळदायकाचे प्रेम आथिलें । ब्रह्मरसाचे वोतिलें घोसुलें । ब्रह्मविद्येचे सार मथिलें । देख सकळ आगमीचे संचले । की बापरखुमादेविवरू विठ्ठल नामें । श्रीगुरूनिवृत्तीने दिधलें प्रेमखूण रया ॥४॥

अर्थ:-

ते क्षीरसागरावर असलेले श्रीविठ्ठलाचे रूप, सर्व व्यापक असूनही बहिर्मुख पुरूषांना ते त्रैलोक्यातही सापडणार नाही. पण आश्चर्य हे आहे की मोठ्या कौतुकाने पंढरीमध्ये ते विटेवर उभे राहिले आहे. याचे कारण एकच आहे की प्रेमळ भक्त जे पुंडलिकराय त्याच्या आवडीकरिता शामसुंदररूप धारण करून ते विटेवर उभे आहे. त्याच्या स्वरूपाचे वर्णन श्रुती शास्त्रांनी व पुराणांनी केले आहे. अशा तऱ्हेने भेटण्याला जे अवघड भगवत्स्वरूप ते पंढरीत उभे आहे. त्यांनी ते सुंदर रूप आपल्या प्रेमळ भक्ताकरिता धारण केले आहे. या त्रिभुवनांत तेच एक रूप सुंदर आहे. त्याचेच नाम जगात मंगलदायक आहे. त्याचे रूप प्रेमाचे ओतलेले आहे. ज्याच्या रूपाला ब्रह्मरसाचे घोस आले आहेत.ज्याचे रूप म्हणजे ब्रह्मविद्यचे सार काढून बनविलेले आहे. ज्याचे वर्णन करण्यामध्ये सर्व शास्त्रे मग्न झाली आहेत ते माझे पिता व रखुमाईचे पती श्रीहरि श्रीविठ्ठल हे नांव धारण करून विटेवर उभे आहेत. त्या पांडुरंगाची प्रेमाची खूण श्रीगुरुनिवृत्तिरायांनी मला दिली असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *