अतिविचार वाईट आणि हानिकारक

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🌴🍁🌴🍁🌴🌻🌴🍁🌴🍁🌴

*अतिविचार वाईट आणि हानिकारक…*

एक विचार करणे आणि खूप विचार करणे यामध्ये फरक आहे… प्रत्येक गोष्टीचा अतिरेक वाईट असतो… आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी आपल्याला विचारपूर्वक वागायला सांगतात… पण इतका विचार केला की, ज्यामुळे कामच करता येत नसेल, तर ते संकट आणि मानसिक आजार बनते… या समस्येला अतिविचार म्हणतात… जास्त विचार करणे ही एक मोठी मानसिक समस्या आहे… एक धनिक गुरुंजवळ गेला आणि त्यांना म्हणाला, गुरुदेव, विचार करून करून माझे डोके भणाणून जाते…

ते विचार थांबवण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा… गुरुदेवांनी त्याच्या हाती एक चमचा दिला आणि त्याला घेऊन ते समुद्र किनाऱ्यावर गेले… धनिकाला वाटले, गुरुजी आपल्याला काहीतरी मंत्र सांगणार असतील… बराच वेळ सागरी लाटांकडे पाहिल्यावर एका क्षणी गुरुदेव म्हणाले, वत्सा, हा समुद्र तुला दिसतोय ना, तो तुला हातातल्या चमच्याने वेचत विरुद्ध बाजूला आणायचा आहे’… तसे केल्याने तुझे विचार आपोआप संपतील… हे ऐकून धनिक चक्रावला, म्हणाला, गुरुदेव, माझी पूर्ण हयात या कामात निघून जाईल… तरी हा समुद्र इवल्याशा चमच्याने इकडचा तिकडे हलायचा नाही… यावर हसत गुरुदेव म्हणाले, वत्सा, एवढे तर कळतेय ना?… या समुद्राकडे बघ… विचारांचा सागर असाच आहे… त्याला भरती ओहोटी येत राहणार…

तू चमचा चमचा प्रयत्न सुरू कर… समुद्र नाही, तर किमान तळे तरी साठेल… या गोष्टीवरून आपल्यालाही हाच संदेश मिळतो की, नुसता विचार करून उपयोग नाही, त्याला कृतीची जोड द्यायला हवी… परंतु विचार करू नका म्हटले, तरी शेकडो विचार डोक्यात येतात… परंतु त्यातून निष्पत्ती काय?… तर शून्य!… उलट, अति विचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातही नसतात…

आपल्याला वाटते, आयुष्यातील प्रश्न संपले, म्हणजे अति विचारांचे चक्र थांबेल… परंतु हे सत्य नाही… कारण दरदिवशी नवे प्रश्न निर्माण होत राहणार आहेत… मग, या प्रश्नांची उकल काढत बसण्यात आयुष्य वाया घालवायचे का?… प्रश्न सोडून द्यायचे का?… दुर्लक्ष करत जगायचे का?… तर नाही!…

विचारांची दिशा बदलायची… केवळ सकारात्मक दृष्टिकोन उपयोगाचा नाही, तर प्रश्न सोडवण्यासाठी आधी वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे… वास्तवदर्शी अपेक्षा पाहिजेत… म्हणजे अपेक्षाभंग होत नाही आणि अति विचारांना खतपाणी मिळत नाही… अतिविचारांपासून सुटका करण्यासाठी वारंवार तुम्हाला स्वत:ला पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार करावे लागतील… नकारात्मक विचार येत असतील, तर डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या अन् सोडा… आपल्या कामातील सुधारणावर भर द्या…

एक डायरी करा… त्यामध्ये दररोजची नोंद ठेवा… त्यासोबत सकारात्मक विचार लिहा… ज्याने तुमचं मन प्रसन्न होईल अन् पॉझिटिव्हिटी येईल… मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण… याचा अवलंब केल्यास निश्चितच चांगला परिणाम जाणवेल आणि आपल्यात सकारात्मक बदल होईल!…

|| बाळासाहेब हांडे || भ्रमणध्वनी : ९५९४४४५२२२

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *