आत्म्याचे अस्तित्व खरंच आहे का?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

आत्म्याचे अस्तित्व खरंच आहे का??
उत्तर = जी माता गरोदर असते, त्या मातेला सुद्धा, आपण गरोदर आहोत, हें दोन महिन्यांनी कळते, याचा अर्थ तो सूक्ष्म जीव
कसा प्रवेश करतो कसा संघर्ष करतो?
दोन महिन्यांनी त्या मातेला कळते कि आपण आई होणार आहोत मग त्या आधी का नाही कळले?? कारण कि तो आत्मा संघर्ष करत असतो, जेव्हा एक संपूर्ण चेहरा तयार होतो,


आणि दोन हात तयार होतात, तेव्हा तो आईच्या गर्भात दोन्ही हात जोडून, प्रार्थना करतो, आणि बोलतो कि, सोडविशी येथूनी, तर मी स्वहीत करिन, स्वहीत म्हणजे, परमार्थ करिन, हें वचन तो ईश्वराला देतो, आणि पण जसा मोठा होतो, तसे ईश्वराला दिलेलं वचन विसरतो, आईचा गर्भ म्हणजेचं नरक, या गर्भात असंख्य यातना गर्भ सहन करत असतो, पृथ्वीवर जन्म घेणे, याचाच अर्थ स्वर्गात
ऋण घेणे होय अवकाशात फक्त ब्रह्मांड आहे, आणि पृथ्वी म्हणजेचं स्वर्ग आहे
संत ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्ञानेश्वरीत, शुक्राणूची माहिती दिली आहे, आठशे वर्षापूर्वी हें लिखाण केले आहे, गरुड पुरणातही हे स्पष्ट व स्वच्छ लिहले आहे.आपण गरुड पुराण अनेकवार वाचले आहे .मग त्या काळात तर सोनोग्राफी नव्हती मग हें गूढ ज्ञान संत ज्ञानेश्वर यांना कुठून प्राप्त झाले,??
आता राहिला, आत्म्याचे अस्तित्व खरेच आहे का? मनुष्य देहाची पुण्याई असे पर्यंतच जिवंत राहतो, पुण्याई संपली कि देह ठेवावा लागतो, bआपल्याला दिसतो तो फक्त देह


मग तो शरीरातील सूक्ष्म आत्मा आपल्याला का दिसतं नाही,??
आत्मा येताना त्या गर्भवती मातेला ही दिसला नाही, आणि जेव्हा मनुष्य देह सोडतो तेव्हाही दिसतं नाही, पण जेव्हा शरीरातुन आत्मा बाहेर निघतो, तेव्हा एक तर तो दुःखी असतो किंवा तो तृप्त झालेला असतो, जर तो अंतरात्मा दुःखी असेल, तर त्या शरीराला लाथ मारतो, आणि बोलतो, स्वहीत करिन असे बोलला होतास, पण या पृथ्वीवर जन्माला येऊन, मनुष्य देहाचे सार्थक, करू शकलास नाहीस
संपूर्ण आयुष्य केवळ देह सुख पाहिलेस,
या कलियुगात संतांची ओळख करून घेऊ शकला नाहीस, आता मला पुन्हा 84 लक्ष योनीचा फेरा मारावा लागणार असे बोलून तो अंतरिचा आत्माराम पुढील प्रवासाला निघतो,


आता ज्या व्यक्तीने प्राण सोडले आहेत, ती व्यक्ती, कुठे अडकली, जसे कि लोभात, किंवा काही खाण्याची इच्छा, अपूर्ण वासना राहिली, तर पुन्हापुन्हा त्या आत्म्यास जन्म घ्यावा लागतो, अश्या कित्येक परमार्थिक व्यक्ती आहेत, जे उपासना करुन, घरात सगळ्यांना सांगून गेलेत, कि आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम नाम घ्यावा म्हणून मरणाचे स्मरण असावे शरीराचे सार्थक करावे, पूर्वजास उद्धरावे हरी भक्ती करुनी
गुरूचरित्र ग्रंथात दुसऱ्या अध्याय मध्ये, कलिकाळ हा ब्रम्ह देवा समोर, आपली जीभ आणि लिंग धरून उभा आहे, आणि त्याने शपथ घेतली आहे कि, पृथ्वीवर मी मनुष्याला नागडा करिन, त्याला कपडे काढायला लावीन, परमार्थ करुन देणार नाही, जीभ, आणि वासना हेच माझं शस्त्र राहील, तेव्हा ब्रह्म त्याला बोलतात, कि *जे संतांना शरण जातील, जे परमार्थ करतील, त्यांना तू बाधा करू नकोस, कली ही अट मान्य करतो, आज आपण पाहतो कि मनुष्य हा केवळ, देहाचे भोग घेत आहे, त्याचा रसनेवर, आणि वासनेवर ताबा नाही, अंगावर कपडे राहिले नाहीत, जे लिहिले आहे, तेच सत्य आता अनुभवायला मिळत आहे, *यातून सुटायचं असेल, तर जा सदगुरूंना शरण,* सुटेल तुझे जन्म आणि मरण, शरणा गतांची वाहे चिंता, तो एक सदगुरु दाता जैसे बालके वाढवी माता, नाना यत्ने करुनी
प्रत्येक मनुष्याकडे आठ विषय आहेत,
1= लोभ , 2 क्रोध, 3 वासना 4 मद 5
मत्सर 6 चिंता 7 भावना 8 संशय
हें आठ विषयी मनुष्याचे मन, आणि अंतरात्मा चालवतात, हें आठही विषय कोणत्याही शाळेत शिकवले जात नाहीत, ते दिसतं देखील नाहीत, पण मनुष्य त्यांचा अनुभव घेत असतो,


मग अंतरात्माची ओळख कशी घ्यायची,??
*ज्याला परमार्थाची प्राप्ती झाली आहे, जो लोभात, आणि वासनेत ना अडकता, केवळ परमार्थ करत आहे, त्यालाच *अंतरीच्या आत्मारामाची ओळख होते*, कारण कि अंतिम समय जेव्हा येतो, तेव्हा त्या व्यक्तीला जाणीव होते, कि आपले या इहलोकांतील कार्य संपले आहे, *मी जे वचन आईच्या गर्भात दिले होते, त्याच सार्थक झाले आहे, आता मला जिवंत पणीच मोक्ष प्राप्ती व्हावी* जेव्हा तो असे नामस्मरण करत अंतरी संवाद साधत असतो,
तेव्हा, परेतून आवाज येतो, आता तुझी जाण्याची वेळ आली आहे, सगळ्यांना निरोप दे, उपासना करुन, पूजा करुन, मनुष्य देह सोडतो, काही जण अंतिम समयी नामस्मरण करताना, देह त्याग करुन गेलेत,
आपण काय करायचे, ते प्रत्येकाने ठरवायचे!!!!!

|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *