जगातील एकमेव मंदिर जेथे स्त्री रुपात आहेत शनिदेव

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

SHANI DEWACDHI MURTI KALI KA ASTAE ?

एकमेव मंदिर जेथे स्त्री रुपात आहेत शनिदेव 🙏🏻*

|| गुजरातमध्ये भावनगर येथील सारंगपूर येथे हनुमानाचे
|| एक प्राचीन मंदिर आहे. जे कष्टभंजन हनुमान नावाने
|| ओळखले जाते. हे मंदिर खूप खास मानले जाते कारण
|| येथे हनुमानासोबत शनिदेव विराजित आहेत. एवढेच
|| नाही तर येथे शनिदेव स्त्री रुपात हनुमानाच्या चरणाजवळ
|| बसलेले आहेत. यामागे एक पौराणिक कथा आहे.

|| का हनुमानाच्या पायाजवळ स्त्री रुपात बसले आहेत
|| शनिदेव पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी शनिदेवाचा
|| प्रकोप खूप वाढला होता. या प्रकोपामुळे सर्व लोकांना
|| दुःख आणि अडचणींना सामोरे जावे लागत होते.

|| शनिदेवापासून मुक्ती मिळवण्यासाठी भक्तांनी
|| हनुमानाकडे प्रार्थना केली. भक्तांचे दुःख ऐकून हनुमान
|| शनीदेवावर क्रोधीत झाले आणि त्यांनी शनिदेवाला दंडित
|| करण्याचा निश्चय केला.

|| शनिदेवाला ही गोष्ट समजताच ते खूप घाबरले आणि
|| हनुमानाच्या क्रोधापासून दूर राहण्यासाठी उपाय शोधू
|| लागले. शनिदेवाला हे माहिती होते की, हनुमान
|| बालब्रह्मचारी असून ते स्त्रियांवर हात उचलत नाहीत.
|| यामुळे शनिदेवाने स्त्रीचे रूप धारण केले आणि
|| हनुमानाच्या चरणाजवळ बसून क्षमा मागू लागले.

|| तेव्हापासून आजपर्यंत या मंदिरात शनिदेव हनुमानाच्या
|| चरणाजवळ स्त्री रुपात आहेत भक्तांचे कष्ट दूर केल्यामुळे
|| या मंदिराला कष्टभंजन हनुमान मंदिर नावाने ओळखले
|| जाते.

|| येथे दूर होतात सर्व शनि दोष एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत
|| शनिदोष असल्यास या मंदिरातील कष्टभंजन हनुमानाचे
|| दर्शन आणि पूजन केल्यास सर्व दोष नष्ट होतात असे
|| मानले जाते. याच कारणामुळे या मंदिरात वर्षभर भक्तांची
|| गर्दी राहते.

|| एखाद्या किल्ल्याप्रमाणे आहे मंदिराचा परिसर सारंगपूर
|| येथील कष्टभंजन हनुमान मंदिराचा परिसर खूप मोठा
|| आहे. हा एखाद्या किल्ल्याप्रमाणे दिसतो.

|| हे मंदिर आपल्या पौराणिक महत्त्वासोबतच येथील सौंदर्य
|| आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. कष्टभंजन हनुमान
|| सोन्याच्या सिंहासनावर विराजमान असून यांना
|| महाराजाधिराज नावानेही ओळखले जाते.
|| हनुमानाच्या मूर्तीजवळ वानर सेना आहे.

स्त्री रुपात शनिदेव आहेत
शनी स्त्री रूप
स्त्री रुपातले शनिदेव

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *