ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.766

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७६६

नेणते ठायीं मन पाहों गेलें । तंव मनचि पावले जागृतीये माये ॥१॥ जागृती अंती स्वप्न देखिलें । जागृती स्वप्न दोन्ही हरपलें ॥२॥ रखुमादेविवरु मरणधारणा भ्याला । तेणें मज दाविला तेजोमय ॥३॥

अर्थ:-

जें परमात्मतत्त्व मनाने जाणले जात नाही. त्याला मन पहावयाला गेले असता तें मनच स्वप्नरुप जागृतीला प्राप्त झाले. व जागे झाल्या नंतर त्याने प्रपंच हा स्वप्नासारखा मिथ्या पाहून स्वप्न व जागृति दोन्ही हारपली. मरण धरण्याला भ्यालेला जो मी त्या मला रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी तेजोमय परमात्मा दाखविला असे माऊली सांगतात

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *