ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.464

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४६४

विवेक नदीये बैसोनी । सांगड सत्त्वाची बांधोनी ॥१॥ एक पंढरी वैकुंठ । येर वाउगे बोभाट ॥२॥ चारी वेद विवादती । पुराणे साक्ष देती ॥३॥ बोले निवृत्तीचा दास । संत गर्जती पापनाश ॥४॥

अर्थ:-

मुमुक्षुने सत्त्वगुणाची सांगड कमरेला बांधून, विवेकनदीतून पंढरीरुपी वैकुंठात जाणे हेच श्रेयस्कर आहे. बाकीच्या साधनांचा उगीच बोभाट असल्यान ती फुकट आहेत. या म्हणण्यास चारी वेद व पुराणे साक्ष देतात. तसेच सर्व पाप नाश होण्यास पंढरीशिवाय अन्य स्थान नाही. संत गर्जना करुन म्हणतात असे निवृत्तीदास ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *