ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.328

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
 प्रकरण :-९ वे, करुणा अभंग ३२८

रंगा येई वो रंगा येई वो । विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई । वैकुंठवासिनी वो जगत्रजननी वो । तुझा वेधु माझे मनीं वो ॥ कटी कर विराजित । मुकुट रत्नजडित पीतांबरू कसिला । तैसा येई का धावत ॥ विश्वरुप विश्वंभरे कमळनयने कमळाकरे वो । तुझे ध्यान लागो बापरखुमादेवीवरे वो ॥

अर्थ:-

माझ्या प्रेमरूपी भजनरंगांत हे विठाबाई देवी तू लवकर ये. तुला किती, नांवे आहेत म्हणून सांगावे ? तुला किठाई म्हणतात. तुला विठाई, कृष्णाई व कान्हाई म्हणतात.वैकुंठात राहाणारी असून जगत्रयाला उत्पन्न करणारी आहे. त्यामुळे तुझा छंद माझ्या मनाला लागला आहे. तूं कटेवर कर ठेवलेली अशी शोभत असून तुझ्या डोक्यावर रत्नजडित मुकुट आहे. कमरेला पितांबर आहे. अशा त-हेच्या देविरूप विठ्ठला तू माझे भजन रंगात धांवत ये. हे विश्वरूप, विश्वेश्वरै कमलनयने, कमलाकरे अशा स्वरूपाने असणारे रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल यांचे ध्यान माझ्या मनांस नित्य लागो असे माऊली सांगतात

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *