ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 853

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके गाईच्या रूपकाने हरीचे वर्णन अभंग ८५३

साई खडियातें देखोनियां माते । तैसा संसारातें येत रया ॥१॥ सोय ध्यान उन्मनी पांचांची मिळणी । सत्रावीचे कानीं गोष्टी सांगें ॥२॥ दुभोनियां खडाणी नैश्वर्य ध्यान गगनीं । चेतलिया मन क्षीर देत ॥३॥ ज्ञानदेवीं समभाव त्रिगुणी नाहीं ठाव । आपेंआप राणीव साई खडिया ॥४॥

अर्थ:-

कटपुतळीच्या लाकडांच्या बाहुल्या करून त्यांना नाचवून दाखविणारा तो जसा जड बाहुल्या नाचवून दाखवितो. पण पहाणाऱ्याला त्या बाहूल्या खऱ्याच वाटतात. वास्तविक त्या मिथ्या आहेत. त्याप्रमाणे तात्त्विक संसार मिथ्या असला तरी. पंचमहाभूतांचे कार्य जो देह त्यांत ध्यानाच्या द्वाराने उन्मनी साधली असता सतरावी जी आत्मकला त्यांची गोष्ट कानांत सांगितल्यासारखी होते. लाथा मारणारी गाय दूध देत असली तरी तें जसे फुकट, कारण तिच्या लाथा झाडण्याने ते सांडले जाते. त्याप्रमाणे अनित्य असा जो संसार त्याच्या चिंतनाचा उपयोग नाही. असे जाणून या नश्वर संसारात जर आत्मचिंतन केले तर मनाला आनंदरूप दूध प्राप्त होते. आत्मसमभाव झाला असता या त्रिगुणरूप प्रपंचाचा ठाव ठिकाणा नाहीसा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचे जे राजऐश्वर्य प्राप्त होते. ते सुद्धा कठपुतळीतील बाहुल्याप्रमाणेच होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *