ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.380

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३८०

काळा पुरुष तो हा गगनांत जो नांदे । अनुभवाच्या भेदें भेदला जो ॥१॥ भेदून अभेद अभेदुनी भेद । सच्चिदानंद जेथ नाहीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे तेथें अक्षय राहिला । आत्मा म्यां पाहिला या दृष्टीसी ॥३॥

अर्थ:-

जो गगनांत भरून उरला आहे. तो हा काळा पुरूष म्हणजे ब्रह्म होय. याच बद्दलचा अनुभव निरनिराळ्या व्यक्तिचा निरनिराळा असल्यामुळे याच्या ठिकाणी भेद वाटतो. याच्या ठिकाणी भेद दिसत असला तरी अधिष्ठान रूपाने अभेद आहे. व अभेद असला तरी उपाधियोगाने पूर्ण भेद दिसतो. याला सच्चिदानंद म्हणणे देखील संभवत नाही. माझ्या ठिकाणी अक्षय असणारा आत्मा मी माझ्या दृष्टीने पाहिला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *