देवासमोर दिवा का लावतात ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇


कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वीच सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो. पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याचे, स्थिर राहण्याचे आवाहन अग्नी देवतेला केले जाते. यानंतर पूजा झाल्यानंतरही देवासमोर दिवा लावला जातो.
आरती करतांना नीरांजनात फ़ुलवात किंवा वात लावून ते देवाच्या तोंडापासून पायापर्यंत ओवाळावे. वात पांढर्या स्वच्छ कापसाची असावी. ती तेलात भिजवू नये. शक्यतोपर्यंत तुपात भिजवावी. निरांनजासारख्या पात्रात दीप लावून तो ओवाळून झाल्यावर समईसारख्या उंच पात्रात ठेवण्याची व्यवस्था असावी.

देवाच्या तोंडावर उजेड पडेल अशा ठिकाणी दीप ठेवावा. देवावर अंधार पडेल अशा ठिकाणी दीप ठेवू नये.
दीप लावताना दीपाने दीप लावू नये. काडीने दीप लावावा. दिव्याने दीप लावल्याने आणि विझल्यावर अर्धवट जळकट वातीची घाण सुटल्याने रोग व दारिद्र्य प्राप्त होते. जमिनीवर वात केव्हाही लावू नये. नीरांजनातून वात काढून ठेवू नये. अनेक वाती लावणे असल्यास विषम प्रमाणात म्हणजे १-३-५-७ अशा लावाव्यात. दीप लावताना त्यात वातीशिवाय थोडे तेल किंवा तेल घालावे.


तुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी अक्षतांचे आसन अर्थात दिव्याखाली अक्षता ठेवाव्या. त्यावर आपल्या इच्छेनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा. देवी लक्ष्मी अक्षतांचे आसन ग्रहण करते असे मानले आहे म्हणून अक्षता ठेवल्याने देवी विराजमान होते.
निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र घालू नये कारण तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे . म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही . नाहीतर तम तत्व वाढेल .
द्यावी.आरती म्हणत असताना देवाला ओवाळताना तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे.आरती ओवाळताना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये.आरती झाल्यानंतर ‘घालीन लोटांगण.’ ही प्रार्थना म्हणावी.यानंतर ‘कर्पूरगौरं करुणावतारं’ हा मंत्र म्हणत कापूर-आरती करावी. कापूर-आरती ग्रहण करावी, म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवावा.

काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी. देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा.
देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे स्थिर होते, अशी मान्यता आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. शुद्ध तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते. अशा तुपाचा जेव्हा अग्नीशी संबंध येतो; त्यावेळी वातावरण एकदम पवित्र होते. प्रदूषण दूर होते. दिवा लावल्याने संपूर्ण घराला त्याचा फायदा होतो.


दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी, याचेही काही नियम सांगण्यात आले आहेत.
दीपम घृत युतम दक्षे, तेल युत: च वामत:।
अर्थ – तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा.
म्हणजेच तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला ठेवावा आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला असायला हवा. धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवावी. आपल्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असल्यास दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवावी. या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानण्यात आल्या आहेत. पश्चिम दिशेला दिव्याची वात असल्यास आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दक्षिण यमाची दिशा असल्याने दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात नसावी, असे सांगितले जाते.


देवासमोर लावलेला दिवा विझला किंवा दिवा लावताना विझला, तर तो अशुभ संकेत मानला जातो. मात्र, धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही. त्यामुळे दिवा विझल्यास घाबरून जाता कामा नये. देवाची आणि दिव्याची क्षमायाचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा. मात्र, दिवा ओवाळताना तो चुकून खाली पडला, तर त्यासाठी दीपपतन नावाची शांत करावी लागते. ज्या ठिकाणी दिवा पडला, त्याच ठिकाणी ती शांत करावी, असे सांगितले जाते.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *