संत सोपानदेव चरित्र १

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भाग-१

अनुक्रमणिका

आज कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस. सगळ वातावरण उदास खिन्न! सगळ्या चराचरावर,अवकाशावर एक खिन्न दुःखी विमनस्कतेची छाया पसरले ली,सार्‍या सृष्टीवर,सृष्टी चक्रातल्या पंच महाभूतवर सुध्दा एक अवकळा पसरली होती.आणि इंद्रायणीच्या घाटावर विमनस्क अवस्थेत बसलेल्या सोपानदेवां चा गोरा रंग काळवंडला होता.नेहमी चेहर्‍यावर दिसणारी भावुक निरागसता आज झाकाळलेली होती.अंगावरच्या उत्तरीयाचंही त्यांना भान नव्हतं.डोळ्यां तील सारं तेज लोप पावुन अविरत वाहणारे अश्रू थांबतां थांबत नव्हते. आणि त्या जीवघेण्या निरव शांततेनं सोपानदेवांच्या दुःखाला जणुं वेदनेचा आवाज फुटुन त्यांनी टाहो फोडला ज्ञानदादाssss

ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेऊन कांहीच तास उलटले होते. समाधीस्थाना वरची ती शिळा सरकावल्याचा प्रत्येक क्षण सोपानदेवांना दुःखाच्या वनव्यांत लपेटुन घेणारा ठरत होता.समाधी ज्ञानदेवांनी घेतली पण सोपानदेवांना वाटत होते आपलंच शरीर निष्र्पाण झालं श्वास कोंडला जातोय,वाहणारं रक्त गोठतेय अशी कांहीशी विचित्र अवस्था सोपानांची झाली.ज्ञानदेवांच्या समाधीचे दुःख एखाद्या प्रपातासारखं कोसळलं. खरंतर आधीच आपण संजीवन समाधी घेणार हे ज्ञानदेवांनी संकेत दिले होते. सगळ्यांनी त्यांना परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्नही केला होता,पण निश्चयाचा महामेरु ज्ञानदेवांनी कुणाचचं, इतकच काय गुरुस्थानी असणार्‍या निवृत्तीनाथांच,लाडक्या सोपानाच,आणि प्राणाहुन प्रिय असलेल्या मुक्ताबाईंचही ऐकलं नाही.

आपलं जीवितकार्य संपल्यावर ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली खरी,पण आपल्या माघारी प्रियजनांचं काय होईल हा विचार त्यांच्या मनाला स्पर्शला नसेल हाच प्रश्न सोपानांचं काळीज कुरतडत होतं.काळजांतील ही वेदना कशी सावरावी?आवरावी?पायाखालची जमीनच सरकल्यावर कसं ऊभं रहायच? कुणाच्या आधारावर?आतां समाधीस्त ज्ञानदादा पुन्हा कधीच दिसणार नाही. त्यांचा आश्वासक स्पर्श परत होणार नाही हे बुध्दीला पटतय पण मनाला?सोपान देवांच्या मनांत विचारांचं काहूर उठलं होतं.लोकांच्या दृष्टीने संत असलेले,भक्तां च्या नजरेत माऊली असलेले ज्ञानदादा त्यांचे सर्वस्व होते.

त्यांचे मोठे भाऊ तर होतेच,पण त्याचबरोबर,आई,वडील,गुरु सखा,परमेश्वर सारच कांही होते.त्यांच्या अगनित आठवणींनी सोपानांचा बांध फुटुन ओक्सीबोक्सी रडु लागले.कोण सांत्वन करणार होत? कोण पाठीवरुन हात फिरवणार?कोण डोळे पुसणार? आक्रोश करत दादाss दादा असा कसा रे निष्ठुर झालास?आईवडील सोडुन गेले तेव्हा आमचं कळण्याचं वयही नव्हतं! पण तूं आमचं सर्वस्व झालास.तेव्हा नव्हतो रे पोरके झालो,आतां मात्र खर्‍या अर्थाने अनाथ झालो.त्यांना हुंदके आवरत नव्हते.

सोपानाss सोपानाsss कुणीतरी हाक मारतय असा अचानक भास झाला, हा तर ज्ञानदादाचा आवाज!त्यांनी चमकुन समाधीच्या चबुतर्‍याकडे बघीतलं,पण छे.. तिथे कुणीच नव्हत. काही तासांपुर्वीच तर त्यांच्या नजरेसमोर हजारोंच्या गर्दीने फुललेला इंद्रनील पर्वतातील “निरंजन गुहा” आळंदीशेजार च्या त्या समाधी स्थळाला एखाद्या तीर्थ स्थळाचं रुप प्राप्त झालं होतं.विशेष म्हणजे या सोहळ्यास पांडुरंगासहित रुख्मिणी आणि समस्त देवगण उपस्थित होते.नामदेवांची मुले नारा,विठा,म्हादा, गोदा सुन्न मनाने राबत होते.विठ्ठल नामाच्या आणि ज्ञानदेवांच्या अभंग व जयजयकाराने सारा आसमंत निनादुन गेला होता.

निवृत्तीनाथ मात्र धीरगंभीर, स्थीर होते. समाधी घ्यायच्या आदल्या रात्री, मुक्ताइने विचारले, दादाsss तूं रागावला,कंटाळलास?कां एवढ्या लवकर समाधी घेतोस?ज्ञानदेव म्हणाले, मुक्ते! ज्या उद्देष्टींसाठी माझा जन्म झाला ते माझे जीवितकार्य पुर्ण झाल्यामुळे मी सधाधीस्त होतोय!सोपान,मुक्ताई,निवृत्ती सह गर्दीच्या महासागराला सामोरे गेले. ज्ञानदेवांना समोर बघतांच सावतामाळी, गोरोबाकाका,नामदेव,सेना न्हावी,परिसा भागवत,सच्चिदानंद बाबा,विसोबा खेचर चोखामेळा इत्यादी संतांनी ज्ञानदेवांच्या पायावर लोळण घेतले.नामदेवांची विकल अवस्था पाहुन म्हणाले,नामया! काय हे?


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *