संत सोपानदेव चरित्र १४

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

भाग – १४

अनुक्रमणिका

मध्यरात्री झोपडी बाहेर येऊन सोपानाने आंघोळ केली.ओलेत्याने पद्मासन घालुन तुळशी वृंदावनाजवळ बसले.श्रीकृष्णाचे स्मरण करुन ओंकार साधनेला सुरुवात केली.ध्वनीलहरींच्या स्पंदनातुन निघालेल्या आवर्तनामुळे अवघ्या सृष्टीला जाग आली.तसेच निवृत्तीही जागे झाले.अवघ्या सृष्टीला वेढणारी ही स्पंदने कुठुन येताहेत?निवृत्ती लक्षपुर्वक ऐकु लागल्यावर, ओंकाराचा ध्वनी गगनवेधी,त्याची दीर्घता क्षितिजापर्यंत होती.षड्जापासुन,तो ओंकार १२ ही स्वरांनंतर मध्य सप्तकात ल्या षड्जापर्यंत पोहचत होता.परत मध्य सप्तकातल्या बारा स्वरांना घेऊन तार सप्तकापर्यंत निनादत होता.पुन्हा तो ओंकार मंद्र षड्जापर्यंत येत होता. अशाप्रकारे मंद्रषड्ज ते तारषड्ज आणि तारषड्ज ते पुन्हा मंद्रषड्ज अशा आवर्तनात फिरत ७२ ओंकाराची स्वर साधना होत होती.तो ओंकार स्वरसाधने चा शुध्द स्वर सोपानांचा आहे हे निवृत्ती ज्ञानदेवांच्या लक्षात आले.दोघेही अंतर्बाह्य थरारले.नऊ-दहा वर्षाच्या सोपानांची इतकी शुध्द ओंकार साधना? इतकी त्यांची स्पंदनं तीव्र होती की,सर्व पृथ्वी,सृष्टी कंपायमान व्हावी,विश्वास ठेवणे कठीण जात होते.दोघेही झोपडी बाहेर आले सोबत मुक्ताही होती.तुळशी वृंदावनाजवळ पद्मासनात सोपान बसलेले होते,पण समोर सोपान नसुन कुणीतरी वेगळ्याच रुपात अत्यंत तेजस्वी,प्रभावशाली,ऋषितुल्य असं! निवृत्तींच्या तात्काळ लक्षात आले,हे तर “जगत्पिता ब्रम्हदेव”!ब्रम्हदेव इथे आहेत मग सोपान

?निवृत्ती-ज्ञानदेव आश्चर्यांने एकमेकांना बघीतले.मुक्ताने घाबरुन निवृत्तींचा हात धरला. तिघांनीही एकदम विश्वकत्यांला हात जोडुन नतमस्तक, डोळे मिटुन तिघंही क्षणभर अविचल स्तब्ध उभे राहिले.ब्रम्हदेवांच्या दर्शनाने त्यांच भान हरपलं होतं.तोच सोपानाचा आवाज कानावर आला,अरे!तुम्ही काय करताय?मला कशाला वंदन करताय? निवृत्तीदादा!वडीलांच्या ठायी असलेले मोठा भाऊ गुरु म्हणुन लाभले.मातृदेवो भव!पितृदेवो भव,आचार्य देवो भव ही तिन्ही श्रध्दास्थानं मला एकाच ठीकाणी गवसली.दादा! मी कृतार्थ झालो.सोपाना चे बोलणे ऐकुन तिघेही भानावर आले. अरे!हा तर आपला सोपान!मग ब्रम्हदेव कुठे गेले?की,सोपान हाच ब्रम्हदेव आहे? नक्कीच आहे. त्रिपुरारी पोर्णिमेला जन्मलेला सोपान साक्षात ब्रम्हदेवाचं रुपच आणि आतां तर ब्रम्हदेवांनी साक्षात आपलं रुप दाखवुन प्रचितीच दिली.आणी अभावित पणे भाऊ,पुत्र,शिष्य या भावना व सोपानांत दिसलेल्या ब्रम्हरुपाने शतगुणित झाल्या.ज्ञानदेवासारखा शिष्य मिळाला म्हणुन धन्यता वाटत होती.पण सोपानासारखा शिष्य लाभल्याने आपण कृतार्थ होणार या भावनेने अगदी नकळत त्यांनी सोपानांभोवती घट्ट मिठी मारली. सोपानाचं ब्रम्हरुप बघीतल्यानंतर तिघांच्याही मनांत एक आदराची भावना निर्माण झाल्याने त्यांच्या वागण्या बोलण्यात झालेला फरक सोपानांना सहन होईना.बदललेल्या वागण्याचा उलगडा होईना.

त्यांची आंतल्या आंत घुसमट होऊं लागली.त्यादिवशी गंडा बांधायचा राहुन गेला होता.त्यांची कोंडी होऊ लागली.आणि अचानक कोंडी फुटली. एरवी हसत खेळत होणारी दुपारचे जेवणं आज शांतपणे चालु होते. एवढ्यात बाहेरुन भोजलिंगाचा आवाज आला.चौघेही धावत बाहेर आलीत. अंगणात भोजलिंगकाका उभे होते. कितीतरी दिवसांनी काका भेटत होते. गावानं विठ्ठलपंत-रुख्मिणिला बहिष्कृत केल्यावर,सिध्देश्वर बेटावर राहायला गेले तिथं हे भोजलिंगकाका होते.त्यांनी यत्किंचितही कुणाची पर्वा,भिती न बाळगतां या कुटुंबाचे सहोदर बनले होते. सर्वतोपरी ते मदत करीत असत.विठ्ठल पंताच्या कुटुंबाशी स्नेह ठेवल्यावरुन कुणी छेडलेच तर,म्हणायचे,मी हाडाचा सुतार आहे.काळजाच्या करवतीने लाकडं कापणे माझं काम!मग त्या करवतीखाली कधी सागवान,बाभुळ येते पण ही तर चंदनाची झाडं!कितीतरी विषारी नागांनी विळखा घालुन बसलेले. या चंदनाच्या झाडांनी सुगंध द्यायचा धर्म सोडला नाही.यांच रक्षण करायचं माझं काम!जोवर माझी करवत चालु असेल तोवर या झाडांना कुणीही धक्का लावु शकणार नाही.त्यांचे असे बोलणे ऐकले की,समोरचा निरुत्तर होऊन निघून जात आणि काका पुन्हा या पोरांमधे रमत असे.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

2 Comments

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading