परमार्थाच्या सात पायऱ्या

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇


पहिली पायरी
१.शुभेच्छा आपलं अज्ञान कधी दूर होईल… आपण कधी एकदा सुखी होऊ.. अखंड सुख म्हणजेच मोक्ष सुख कधी भेटेल याची तळमळ लागायला पाहिजे….
दुसरी पायरी
२. विचारणा सद्गुरू माऊलींचा बोध ऐकल्यावर त्यांच्या विचारमध्ये गढून जायचं.. त्याचं मंथन करायचं…
तिसरी पायरी
३. तनुमानसा जे आपण ऐकलं, श्रवण केलं त्याचा ध्यास लागायचा.. सतत त्या अखंड सुखाचा आनंद घ्यायचा….


चवथी पायरी
४.सत्वापत्तीस्वतः आपण अज्ञानी आहोत.. याचा पूर्ण विश्वास बसल्यावर.. आपण स्वतः स्वतःमध्ये रममाण व्हावयचं…. तीन देह (कारण, सूक्ष्म व स्थूल) सोडून आपण आहोत, व त्रिगुणामधील सत्व गुण वाढविण्याचा प्रयत्न करायचा…
पाचवी पायरी
५.आसंशक्ती.. परमपूज्य आईंनी पाच विषयांचा उल्लेख केलेला आहे.. त्या सर्वांचा ध्यास सोडून.. कायम आनंदात असणे.. म्हणूनच गुरुमाऊलींनी आपल्याला सतत नाम घ्यायला सांगितलं आहे…


सहावी पायरी
६. पदार्थभाविनी हे संपूर्ण जग एक भ्रम आहे… माया आहे.. याच्यावर पूर्ण ठाम विश्वास ठेवायचा.. आणि त्याच प्रमाणे जगात वावरायचं.. दुःख आलं तरी खचायचं नाही.. आणि सुख मिळालं तरी जास्त त्या मध्ये वाहून जायचं नाही…
सातवी पायरी
७. तुर्यगा परमपूज्य गुरुमाऊली ज्या स्थितीत आहेत ती म्हणता येईल.. म्हणजेच प्रत्यक्ष स्वरूप दर्शन झाल्यावर आपल्या सर्वांना अनुभव येईल अशी स्थिती….

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *