अनासक्त कर्म

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

शनिवार २७ नोव्हेंबर, २०२१
विजयजी पांढरे सर
9822992578
27-11-2021
vbpandhare@gmail.com

*अनासक्त कर्म* या जगात जे जे बंधनात पडले, संकटात पडले, दुःखी झाले त्याच्या मुळाशी आसक्ती हा फार मोठा दोष आहे. चांगल्या कामासाठी जगणे आणि ते करता यावे म्हणून जेवणे हे बरोबर आहे. या समाजात अशा वृत्तीचा एक वर्ग आहे की जो केवळ जेवण्यासाठी जगत असतो, चांगली पक्वान्ने भरपूर खाणे हाच त्यांचा उद्देश असतो. आणि या पध्दतीने मागे पुढे कसलाही विचार न केल्याने भरपूर आणि आवडेल ते खाणे, या अन्नाच्या आसक्तीमुळेच त्यांना नंतर वेगवेगळ्या रोगांच्या तावडीत सापडावे लागते. जेवण मर्यादित आणि सात्विक, आसक्तीरहीत घेतले तर त्याचा शरीराला त्रास न होता फायदाच होतो. कोणाला पैशाची लालसा असते, मग तो पैसा मिळवण्यासाठी भलेबुरे कोणतेही मार्ग पत्करण्याची त्याची तयारी असते. आणि मग या मुळे त्यांचे मनस्वास्थ बिघडते, शांती नाहीशी होते, जीवनातले समाधान संपून जाते. याप्रमाणे प्रत्येक आसक्तीमागे दुःखाच्या सावल्या पाठलाग करत असतात. रात्री पेटवलेल्या दिव्याच्या मोहक रुपाला पाहून पतंग त्याकडे आकर्षिले जातात, आणि त्या आसक्तीमुळे त्यांना जीवनाचे मोल द्यावे लागते. त्याच प्रमाणे सुंदर कमळाच्या मधूर रसाची आसक्ती धरल्यामुळे भ्रमर कमळात अडकले जातात, याप्रमाणे आसक्ती हे बंधनाचे, दुःखाचे कारण आहे. आणि या बंधनातून सुटायचे असेल, त्यापासून मोक्ष मिळवायचा असेल तर *अनासक्त कर्म हाच उत्तम मार्ग आहे*.

स्वामी विज्ञानानंद
साम्यविज्ञान ६/१
Manashakti Research Centre Lonavala
२७/११/२१, संध्याकाळ ५:२८ – Vijay Sir Pandhre: 🙏🙏

: सर्व लेख सूची पहा :-

विजयजी पांढरे सर
09822992578
27-11-2021
vbpandhare@gmail.com

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *