ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.919

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९१९

जियेचा अंबुला रूसुनीयां जाये । तयेचें जीवित्व जळो गे माय ॥१॥ आम्ही रुसों नेणों आम्ही रुसों नेणों । अंबुलिया रुसों नेदू गे बाईये ॥२॥ ज्याच्यानी अंगे जोडला हा ठावो । रखुमादेविवरु नाहो बुझाविला ॥३॥

अर्थ:-

परमात्मरुप पति, जिला टाकून रुसून गेला तिच्या जीवीत्वाला आग लागो. माझी मात्र तशी स्थिती नाही. कारण मी माझ्या परमात्मरुपी पतीला रुसू देत नाही. ज्याच्या कृपेने मी परमात्मस्वरुप अवस्थानाला प्राप्त झाले. ते रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल माझे पति त्याची मी समजूत केली.असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *