ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.918

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९१८

अंबुला माहेरी भोगी धणीवरी । मग तया श्रीहरि सांगो गुज ॥१॥ माझें सुख मीच भोगीन । क्षेमेंसी निगेन अंगोअंगीं ॥२॥ सांडुनी कुळाचार जालीये निर्लज्ज । तुम्ही काय मज शिकवाल ॥३॥ रखुमादेविवरु विठ्ठल मातापिता । मी त्याची दुहिता सर्वांगणी ॥४॥

अर्थ:-

माझ्या पतिला माहेरी म्हणजे मी आपल्या स्वरुपांच्या ठिकाणीच आनंदाने भोगीत आहेत. अशा भोगाच्या आनंदात श्रीहरिजवळ गुज गोष्टी करीन. मी आपले सुख मीच भोगित आहे. आणि पतिला वरचेवर क्षेम देण्याकरिता अंग उपांगाने निघत आहे. लौकिक कुलाचाराचा परित्याग करुन मी निर्लज्ज झाल्यावर तुम्ही मला लौकिकाच्या गोष्टी काय शिकवणार. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तीच माझी माता व तोच माझा पिता असून सर्वांगाने मीच त्याची मुलगी होय, असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *