ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.727

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२७

जन्माआवर्ती येरझारी फिटली । ब्रह्मसमदृष्टि जाली गुरूमुखें ॥१॥ भागल्याचा सिणु भागल्यानें नेला । भाग्योदय जाला भाग्येवीण ॥२॥ रखुमादेविवरू भाग्ये जोडला । जोडोनी मोडला कांहीं नव्हतेपणें ॥३॥

अर्थ:-

जन्ममरणाच्या भोवऱ्यात होणारी माझी येरझार फिटली. कारण श्रीगुरूमुखाने ब्रह्मस्वरूपामध्ये समदृष्टि झाली. जन्ममरणाच्या फेऱ्यांत ज्याला श्रम झाल्याचा सीण झाला होता.त्याच्याकडूनच तो नाहीसा झाला. व्यवहारांत ज्याला भाग्य म्हणतात. त्याहून निराळ्या पारमार्थिक भाग्याचा उदय झाला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते भाग्याने जोडले व त्या जोडण्याने तात्विक नसलेला संसारधर्म नाहीसा झाला असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *