ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.416

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४१६

आत्मराम देखे सहस्रदळावरी । उन्मनी हे पाही आरुते तेही ॥१॥ चक्षूचे अंतरीं चक्षू देखे पूर्ण । हेचि की रे खूण तुझे ठायीं ॥२॥ मी ब्रह्म सोहं ज्ञानपद तें साजिरें । ते ठायीं निर्धार तुझा तूंचि ॥३॥ बापरखुमादेविवरा तुझा तूं आपण । सर्व हे चैतन्य तुझे ठायीं ॥४॥

अर्थ:-

आत्मस्वरुपाला सहस्रदळकमळावर पाहणे यादृष्टीने उन्मनी अवस्था ही निकृष्टच आहे. ज्ञानरुप जो आत्मा तोच सर्वांचा प्रकाशक आहे. हीच एक खूण तूं आपल्या ठिकाणी पाहा. मी ब्रह्म आहे. असे प्रतिपादन करणारे. जे ‘सोहं’ पद ते नाचत तुझ्या ठिकाणी येईल. सर्व व्यापक ब्रह्मचैतन्य तूं म्हणजे माझे पिता व रखुमाई पती श्री विठ्ठल स्वतःच आहे. हे तु विचार करुन पाहिल्यास कळून येईल.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *