ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.346

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३४६

आकाश जें दिसे दृष्टीचिया पोटीं । शून्यत्वासी घोटी चैतन्यांत । अर्थ पाहतां सांकडे ऐकतां । कैसे करू आतां निवृत्ति सांगे । सांगताचि गुज देखिले नयनीं । हिडताती मौनी याची लागी । ज्ञानदेवाचा अर्थ कुटस्थ परिपूर्ण । अपुर्णहि पूर्ण होय जेथें ।

अर्थ:-
आकाश जरी सर्वव्यापी दिसत असले तरी चैतन्याच्या दृष्टीने ते अल्पच वाटते. या तत्वाचा विचार करु लागलो. तर मोठी अडचण वाटते.म्हणुन निवृत्तिरायांनी सांगितल्या प्रमाणे ते गुह्य मी पाहिले याच करिता मौनी योगी लोक हिंडत असतात. हा सर्व अर्थ कुट स्वरुपाचा आहे.परंतु त्या कुटाच्या जागी अपुर्ण अर्थ पुर्ण होतो.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *