संत तुकाराम म. चरित्र ७

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

तुकाराम भाग-७

विश्वंभरबोवापासुन तुकाराम महाराजांच्या घराण्यांतील सर्वांना भागवत धर्मीय संताबद्दल अत्यंत आदर होता. महाराजांनी संसारत्याग करुन भक्ती मार्ग धरला. परंतु बायको-पोरांची ओळख विसरले नाही. फक्त ते गुंतुन राहिले नाही. संसारात असतांनाच त्यांच्या भक्तीमुळे व आचरणामुळे परमेश्वर त्यांच्या घरी भेटला.

इतकेच नव्हे तर त्यांच्या मुळ पुरुषाने खर्‍या भक्तीच्या जोरावर पंढरपुरच्या विठोबास देहुस येण्यास भाग पाडले. प्रत्येक अवतारी पुरुष हा स्वतः पुर्वजांच्या प्रतिनिधीरुप असतो.देहुगांवचे क्षेत्रमहात्म्य वाढते असल्यामुळे आसपासचे लोक येऊन इंद्रायणीत तिर्थ म्हणुन स्नान करीत, हे पाहुन त्यांच्या धार्मिक भावना उचंबळुन येत. आपल्या पुर्वजांनी इथे भक्तीचा वृक्ष लावुन भक्तीमार्गाने जाण्यासाठी मोठी कमाई करुन ठेवल्याने आपण त्याच मार्गानेच गेले पाहिजे असा त्यांनी निश्चय केला.

संसाराचा सारा भार परमेश्वरावर टाकुन भक्ती हेच आयुष्याचे मुख्य ध्येय ठरविले. जिजाऊने त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न वाया गेला. त्यांचा निश्चय कोणीच फिरवु शकलं नाही. घरांत राहिल्याने मन विचलीत होत असल्यामुळे दिवसा गृहत्याग करुन सायंकाळी घरी यावे. रात्री भजन करावे नंतर एखादा दुसरा दिवस रानांत मुक्काम करावं. कांही दिवसांनी संसाराबद्दल पुर्ण उदासीन झाले.

सर्व संगी वीट आला !तूं एकला आवडसी ।
दिली आतां पायी मिठी ।जगजेठी न सोडी ।।
दुःख वांदडी आहे हा संसार।येके सार भगवंता ।।

महाराज आपल्या ध्येयाचा मार्ग आक्रमु लागले. ते पंधरा दिवस घरी न आल्याने जीजाईला काळजी वाटु  लागली. कान्होबांनी त्यांना नेहमीच्या सर्व ठीकाणी शोधले पण न सांपडल्याने निराश होऊन घरी परतले. तेवढ्यात माहिती मिळाली की, ते भांडारा डोंगरावर आहेत. हा डोंगर देहुपासुन तीन मैलावर आहे. तीथे पुर्वीच्या त्यागी लोकांच्या गुहाही आहेत. तिथुन महाराजांना घरी चलण्यासाठी कान्होबाने हट्टच धरल्यामुळे गावाजवळच्या इंद्रायणी नदीच्या पैलतीरी येऊन बैठक  मारली. आणि कान्होबास त्यांनी सावकारीची खतपत्रे आणण्यास सांगीतले.

तुकाराम कान्होबास म्हणाले ही खतं संसारांतील पाश असल्यामुळे सर्व इंद्रायणीस अर्पन करतो. त्यावर कान्होबाने हरकत घेतल्यावर त्याच्या हिश्शाची निम्मी खतं देऊन बाकीची खतपत्रे स्वहस्ते इंद्रायणीच्या पाण्यांत बुडवली आणि निर्विकार मनाने तिथेच बसुन राहिलेतही हकीकत जीजाईला कळल्यावर खतपत्रे पाण्यांत गेल्याचे दुःख न करतां महाराज सांपडले याचाच आनंद झाला.

तीने त्यांना घरी आणले.सावकारीची खतपत्रे पाण्यात टाकणे म्हणजे “संसाराचे पिंडदान स्वहस्ते पिंडदान स्वहस्ते करणें होय”तुका म्हणे जो या संसारांत रुसला ।तेथे ठाकीला सिध्दपंथा ।।महारांजांनी संसाराचे पिंडदान केल्यावर इश्वरप्राप्तीसाठी भक्ती हेच औषध घेऊन द्रव्यास स्पर्श न करण्याचे पथ्य सांभाळल्यामुळे त्यांच्या हातुन महाराष्टाच्या उध्दाराचे महान कार्य घडले.

क्रमशः

संकलन-मिनाक्षी देशमुख

संत तुकाराम महाराज संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *