लेख क्रमांक (१) ” गुरू ” ज्योतिष विषयक मार्गदर्शन :- नरेंद्र जोशी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🟨 गुरू🟨
लेख क्रमांक (१)

नवग्रहातील एक शुभग्रह व तारणहार

🟨*देवानांच ऋषीणांच गुरुं कांचनसन्निभम्।*
*बुध्दिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्।।*‌

*अर्थ*
देवानांच….
देवांचे तसेच ऋषींचे ही गुरु, सुवर्णा प्रमाणे (पीतवर्ण आणि चमकदार),बुद्धीमान,तिन्ही लोकांचा स्वामी अशा बृहस्पती (गुरु)ला माझा नमस्कार असो

🟨 देवांचे गुरुत्व गुरुकडे असल्याने याच नावाने त्यांचा सदैव गौरव पुराणातून केला आहे.गुरु हा अत्यंत शुभ पण वाईट मात्र खात्रीने करणार नाही. गुरुची फले इष्ट असल्याने अगदी अल्प उपासनेने देखील तो फलदायक ठरतो.


🟨पृथ्वीवरील औषधी वनस्पतींमध्ये असणारे गुण गुरू आणि चंद्र यांच्या सान्निध्याने अधिक तीव्र होतात. चंद्रामुळे वनस्पती पुष्ट बनतात तर गुरूमुळे त्या वनस्पतीतील औषधी गुणांचा उत्कर्ष होतो. विशेषतः चंद्र, सूर्य, आणि रवि हे पुष्य नक्षत्री एकत्र आल्यास प्रचंड संपत्तीचा लाभ गुरूमुळे होऊ शकतो.त्याचप्रमाणे हाच योग अश्विनी नक्षत्रावर आल्यावर सर्वत्र निरोगीता नांदविण्यासाठी या ग्रहाच्या मंत्राचा विनियोग करण्यात येतो.

🟨 गुरू हा मुळचाच शुभ ग्रह असल्याने अनिष्ट ग्रहाबरोबर त्याचा संयोग असल्यास अनिष्टतेची तीव्रता कमी करण्यात त्याचा विनियोग करतात. गुरूच्या फळाबाबत पूर्वसुरींनी फारच चांगले अनुभव ग्रथित केलेले आहेत. त्यावरून कोणत्याही शुभ कार्याला गुरुची उपासना स्वतंत्रपणे करावी असे सांगण्यात आले आहे. विशेषतः लग्न आणि उपनयन यासारखे महत्त्वाचे विधी गुरुबलाशिवाय पार पाडू शकत नाही. कठिण समयी ब्रहस्पतिशांति अगोदर करून हे विधी नंतर पार पाडले जातात.

🟨 चंद्र आणि सूर्य यांच्या खालोखाल ग्रहमालेत गुरुलाच मान देण्यात येतो.याचे कारणदेखील असेच असावे . मानवी शरीराचा विचार करता चिंतन नावाच्या प्रक्रियेवर गुरुचे नियंत्रण आहे. चिंतणामुळेच आयुष्यातील फार मोठे प्रश्न निर्णायक स्तिथीला आणता येतात अर्थात गुरुचे पृथ्वीवरील प्राण्यांवर असणारे आकर्षण या सर्वांचा पाया आहे. हे विसरून चालणार नाही.

🟨 ज्या मानाने ते आकर्षण कमी जास्त प्रमाणात असेल त्या मानाने त्या वस्तूचे आयुर्मान आणि सुंदरता वाढत जाते. अध्यात्मिक उन्नतीसाठी अन्य कोणत्याही ग्रहापेक्षा गुरुचे सामर्थ्य अधिक असावे लागते.तरच त्याची त्या मार्गात चांगली उन्नती होते. अन्यथा त्या मार्गात अनेक अडथळे निर्माण होतात.

🟨*देवानांच ऋषीणांच गुरुं कांचनसन्निभम्।*
*बुध्दिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्।।*‌


🟨 वरील गुरूच्या जपाचा विनियोग अनेक कारणांसाठी होतो विशेषतः मंद बुद्धीच्या मुलांनी याचा जप अवश्य करावा ,त्याचप्रमाणे ज्यांना बुद्धीचे काम अधिक आहे त्यांनी या जपाचा अवलंब केल्यास त्यांच्या बुद्धीला येणारा ताण कमी होईल. बुद्धी अखेरपर्यंत तीव्र राहील.|

🟨 अध्यात्माच्या मार्गात ज्यावेळी काही प्रगती होत नाही असे वाटते किंवा अनेक अडथळे येण्यास प्रारंभ होतो तेंव्हा गुरूच्या जपाने असे अडथळे हळूहळू कमी होतात संसारी अथवा परमार्थी घ्यावे लागणारे निर्णय हे नेहमी अचूक असावे लागतात.

🟨सूर्य अश्विनी नक्षत्रावर असताना केलेला जप आरोग्य देतो श्रवण नक्षत्रावर विद्या,पुष्य आणि पुनर्वसु नक्षत्रावर धन,
आणि मृग नक्षत्रावर कोणत्याही कार्याची सांगता
निर्विघ्नपणे होते.

गुरूचा जप केल्याने असे विविध उपयोग असल्याचे दिसून येईल

🟨 पुढील भागात आपण जप कसा करायचा या विषयी सविस्तर माहिती व गुरू विषयी अधिक माहिती पाहणार आहोत.

ज्योतिषी व वास्तुशास्त्र सल्लागार
नरेंद्र जोशी
9763439584

ज्योतिष विषयक मार्गदर्शन व सल्ला
सशुल्क मार्गदर्शन केले जाते
शिक्षण आरोग्य, नोकरी, व्यवसाय, विवाह, संतती,प्रगती,उन्नती,भागीदारी,वैवाहिक समस्यां,कोर्ट कचेरी, व्यावसायिक अडचणी,बाधा,इ विषयक सर्व ज्योतिष विषयक समस्यांचे निराकरण व्हाट्सएपच्या माध्यमातून pdf स्वरूपात केले जाते
त्याचप्रमाणे🟥
ज्योतिष व वास्तुशास्र विषयक
ज्योतिष प्रविण ,ज्योतिष प्राज्ञ प्रबोध,विशारद,ज्योतिषाचार्य,पंडित हे व्हाट्सअप द्वारे अभ्यासक्रम घेतले जातात

नरेंद्र जोशी ,ज्योतिषी व वास्तुशास्त्र सल्लागार 🟩
संचालक श्री गणेश ज्योतिष व वास्तुशास्र कार्यालय ,पुणे
व्हाट्सअप नंबर
9763439584🟦

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *