संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा ८१ ते ८५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

दुजेपणा मिठी आपणचि उठी अभंग क्र.८१

दुजेपणा मिठी आपणचि उठी । कल्पना हे सृष्टि गाळू पाहे ॥
ते कृष्णरूप गाढे यशोदा घे पुढे । दूध लाडेकोडे मागतसे ॥
सृष्टीचा उपवडु ब्रह्मांडाचा घडु । ब्रह्मिंचा उपवडु उघडा दिसे ॥
निवृत्ति उघड ब्रम्हांडामाजि लोळे । नंदाघरी खेळे गोपवेष ॥

अर्थ: एकट्या असलेल्या परमात्माने आपल्या कल्पनेने जगतरुपाचा पसारा मांडला व ते द्वैताची निर्मिती करुन स्वतःला पाहु लागले. तोच परमात्मा कृष्ण रुप धारण करून यशोदे कडे लाडाकोडाने दुध दही मागत आहे. ज्या रुपात अनंत ब्रह्मांडे आहेत.ते कृष्णरुप नंदाघरी खेळीमेळेने राहते. निवृत्तिनाथ म्हणतात ते निर्गुण परब्रम्ह गोपवेशात नानाप्रकारचे खेळ करत नंदा घरी नांदत आहे.

मेघ अमृताचा जेथूनि पवाड अभंग क्र.८३

मेघ अमृताचा जेथूनि पवाड । दुजियाची चाड नाही तेथे ॥
ते रूप अरूप सुंदर सावळे । भोगिती गोवळे सुखसिंधु ॥
विराट नाटकु वैराज जुनाटु । गोपवेषे नटु नंदघरी ॥
निवृत्ति सत्वर सेवि सुखसार । प्रकृति आकार लोपे ब्रह्मी ॥

अर्थ: तो परमात्मा प्रेमामृताचा मेघ होऊन गोकुळाच्या अवकाशात आला आहे. त्याला दुसऱ्या कोणाच्या सहाय्याची गरज नाही. तोच रुप रहित अमृतमय परमात्मा सुंदर सावळे कृष्णरुप घेऊन गोकुळात आल्याचे सुख सगळे भोगत आहेत. त्या विराट आशा परमात्माला कोणी जोड नसल्याने त्याचे राज्य सर्वत्र असते.तोच परमात्मा गोपवेशात नंदाघरी राहत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात त्याच्या सुखरुप पणाचे प्रकृती, आकार विरहित रुप संत भोगतात.

वैभव विलास नेणोनिया सायास अभंग क्र.८४

वैभव विलास नेणोनिया सायास । कल्पनेची आस नाही जेथे ॥
ते रूप दुर्लभ कृष्णमूर्तिठसा । वोतल्या दशदिशा नंदघरी ॥
योगीयांचे ध्यान मनाचे उन्मन । भक्तांचे जीवन गाई चारी ॥
निवृत्ति साकार ब्रह्मींचा प्रकार । ऊँतत्सदाकार कृष्णलीला ॥

अर्थ: जो परमात्मा अरुप आहे त्याच्या ठिकाणी वैभव, विलासांचे सायास नाहीत. कल्पनाचे आस नाही. त्या परमात्म्याला आकारच नाही त्याला दिशा मध्ये कसे बांधणार असा तो नंदाघरी दुर्लभ श्रीकृष्ण रुप घेऊन आला आहे.तोच परमात्मा योग्यांचे निजध्यान जरी असले तरी ते नंदाच्या गाई राखत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात तो परमात्मा आपल्या लिला ॐ तत्सदाकार आहेत त्याच मंत्रात मी लीन आहे.

ब्रम्हांड करी हरि ब्रह्म झडकरी अभंग क्र.८५

ब्रम्हांड करी हरि ब्रह्म झडकरी । ते नंदयशोदेघरी खेळतसे ॥
त्रैलोक्यदुर्लभ ब्रह्मांदिका सुलभ । रुक्मिणीवल्लभ कृष्ण सांवळा ॥
हिरण्याक्ष वधूनि दाढेवरी मेदिनी । तो हा चक्रपाणी यशोदेचा ॥
रामावतारु गाढा दशशिरा रगडा । रिठासुर दाढा तेणेपाडे ॥
चतुर्भुज श्रीपति सकुमार साजती । शंख चक्रांकिती हरि माझा ॥
निवृत्ति ध्यान शूर सर्वरूपे श्रीधर । जिंकिला भौमासुर रणयुद्धी ॥

अर्थ: ज्या ब्रह्मांडाची निर्मिती त्या हरिने त्वरित केली तो नंद यशोदोच्या घरात खेळणारा हरिच आहे. तो रुक्मिणीचा पती सावळा कृष्ण त्रैलोक्याला अवघड व ब्रह्मादिकांना सोपा झाला आहे. दाढेवरी पृथ्वीचे हरण करणारा हिरण्याक्ष मारणारा तोच यशोदेचा कुंवर आहे. रामअवतारात दशानन रावणाला मारणारा व बैल झालेल्या रिठासुराच्या दाढा उपटणारा तोच आहे. तोच शंखचक्र घेतलेला सावळा सुकुमार माझा हरि आहे निवृत्तिनाथ म्हणतात त्याच शुर हरिने भौमासुराचा म्हणजेच नरकासुराचा वध केला.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *