👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा
निरशून्य गगनी अंकुरले एक अभंग क्र.७६
निरशून्य गगनी अंकुरले एक । ब्रम्हांड कवतुक लीळातनु ॥
ते माये वो हरि गोपिका भोगिती । शुखचक्राकृती कृष्ण मूर्ती ॥
निराभास आस निःसंदेह पाश । तोचि हृषिकेश नंदाघरीं ॥
निवृत्ति प्रकार ध्यानाचा विचार । सर्वत्र श्रीधर यशोदेचा ॥
अर्थ: त्या निराशुन्य आकाशातुन प्रगटलेल्या एका बीजाने आपल्या लिळेतुन हे जगत विस्तारले किंवा जन्माला घातले. तोच परमात्मा शंख चक्र घेऊन कृष्णरुपात गोकुळात अवतरला व त्याचे सुख तेथील गौवळणी नित्य भोगतात. निवृतिनाथ म्हणतात, मी सर्वत्र त्या यशोदेच्या श्रीघराला पाहतो व तोच माझा ध्यानाचा प्रकार बनला आहे. .
निराळ निरसी जीवाशीवरसी अभंग क्र.७८
निराळ निरसी जीवाशीवरसी । सर्व ब्रह्म समरसी वर्ते एक ॥
ते रूप परिकर कृष्णमूर्ति ठसा । गोपिकाकुंवसा नंदाघरी ॥
संसाराचे तारू ठाममाण दिसे । शाम प्रभावसे तये ब्रह्मी ॥
निवृत्ति घनदाट कृष्ण घनःश्याम । योगी जनाध्यान नित्यरूपे ॥
अर्थ: तो परमात्मा सर्व ठिकाणी जीवशिव स्वरुपात ओतप्रोत भरला आहे. व तोच एकत्वाने आपले ब्रह्मरुप सांगत असतो. तेच ब्रह्म सुंदर श्रीकृष्णरुप घेऊन गोपाळ व गोपकांचे आश्रयस्थान होण्यासाठी नंदाघरी आले आहे. सांजवातेतुन निघणाऱ्या प्रभे प्रमाणे ह्याचे श्यामवर्ण कृष्ण होऊन आले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात योगी ज्या रुपाचे ध्यान करतात ते घनश्याम रुप सर्व ठिकाणी भरलेले आहे. व ह्याचा मला अनुभव आहे.
निरासि निर्गुण नुमटे प्रपंच अभंग क्र.७९
निरासि निर्गुण नुमटे प्रपंच । विषयसुख साच नाही नाही ॥
ते रूप गोजिरे कृष्णमूर्ति ठसा । तो गोपाळ समरसा माजि खेळे ॥
चित्ताची राहाविते आपणचि द्रष्टे । नेतसे वैकुंठा नाम घेता ॥
निवृत्तिसी ध्यान सर्व जनार्दन । वैकुंठ आपण गोपींसंगे ॥
अर्थ: ते गुणातीत परब्रह्म जे निर्गुण आहे. त्यामुळे त्याचा विषयसुखाशी संबंधच येत नाही. हे नाही शब्दाची द्विरोक्ती करुन सांगतात.तेच निर्गुणरुप सगुण साकार कृष्णरुप घेऊन गोपाळांबरोबर त्यांच्या सारखे होऊन खेळ खेळत आहे. ते रुप चित्तात राहते व आपण आपणास पाहते व त्याचे धारण चित्तात करुन नामसाधना करणाऱ्या साधकास वैकुंठात नेते. निवृत्तिनाथ म्हणतात, तो परमात्मा गोपीसंगे राहतो त्याचे ध्यान केले की तो सर्व जनात प्रतित होतो.
निरालंब देव निराकार शून्य अभंग क्र.८०
निरालंब देव निराकार शून्य । मनाचेही मौन हारपले ॥
ते रूप साबडे शंखचक्रांकित । यशोदा ते गात कृष्णनाम ॥
मौनपणे लाठे द्वैत हे न साहे । ते नंदाघरी आहे खेळेमेळे ॥
निवृत्ति आकार ब्रह्म परिवार । गोकुळीं साकारमूर्ति ब्रह्म ॥
अर्थ: जो परमात्मा कोणावर अवलंबून नाही जो निराकार आहे.त्याच्या ध्यानाने मनाचे मौन्य हरपते. शंख चक्र ही आयुधे घेऊन ते कृष्ण रूप सहज सगुणात्मक साकार झाले आहे. ते कृष्णरुप निरागस होऊन हातात शंखचक्रनिरागसअवतरले आहे. त्याला माता यशोदा त्याचे नामगायन करुन रिझवते.निर्गुणरुपातील मौन स्तब्धता सोडुन ते गोपी समावेत खेळ खेळत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या गोकुळात अवतरेल्या कृष्ण रुपाचा मी आश्रय घेतला आहे.
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६