ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.920

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९२०

अष्टभावें भोगितां न पुरे धणी । देह उगाणी केली देखा ॥१॥ अंबुला निघाला अंबुल्या गांवा । मी वो तया सवा जातू असें ॥२॥ रखुमादेविवरू लागलासे चोरु । मार्ग बुडविला घराचारु ॥३॥

अर्थ:-

अष्टसात्त्विक भावाने भोगित असतांना अंतःकरणाची तृप्ति होत नाही. पुन्हा पुन्हा भोगाची इच्छा होतेच म्हणून मी आपला देह त्याच्यावरुन ओवाळून टाकला. माझा पति आपल्या गांवी म्हणजे स्वरुपाच्या ठिकाणी निर्गुण निघाला असता मीही त्याच्याबरोबर चालले आहे. म्हणजे मीही निर्गुण स्वरुप झाले आहे. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हा एक भक्ताचा संसार चोरणारा असून तो माझ्या पाठीशी लागून माझा सर्व संसार त्यानी बुडवून टाकला असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *