ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.363

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३६३

आत्मज्ञान जया न देखा निजदृष्टी । तया नरा गोष्टी करू नये ॥१॥ तुर्यारूपें जाण प्रभा हे निस्सीम । तया परता राम असे बापा ॥२॥ ज्ञानदेवा गुज दाविलें गुरूनें । मने अनन्ये कल्पितांची ॥३॥

अर्थ:-

ज्या पुरूषाला आत्मज्ञान झाले नाही त्याच्याशी भाषण करणे टाळावे. ओंकाराचे ध्यान करीत असता इतर पदार्थाचा विसर पडून जी अवस्था लाभते. तिला तूयवस्था असे म्हणतात. त्यात देखील द्वैत(ध्येयरूप) असल्यामुळे तिच्याही पलीकडे आत्मा आहे. असे गुह्यज्ञान श्रीगुरू निवृत्तिनाथांना मी अनन्यभावाने शरण गेल्यामुळे त्यानी मला दिले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *