ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.716

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-७ वे, संतमहिमा अभंग ७१६

भाग्याचा उदयो की दैवाची गति । मज जोडली संगती सज्जनांची ॥१॥ माझें मीच भांडवल घेऊनियां निगुती । लाभाची गति श्रीविठ्ठलु ॥२॥ देशदेशाउरा नलगेची जाणें । ठायींच जोडणे एक्या भावें ॥३॥ खेपखेपांतर अनेक सोशिलें । मुद्दल उरलें लेखा चारी ॥४॥ मुद्दल देऊनि वाणेरा फेडिला । उत्तीर्ण झाला दोही पक्षीं ॥५॥ चौघे साक्ष ठेवुनी अतरीं । वेव्हार ज्ञानेश्वरी खंडियेला ॥६॥

अर्थ:-
आज मला संताची संगती घडली. हा माझा भाग्योदय म्हणा किंवा दैवाची गति म्हणा. माझे मीच चांगल्या पुण्याईचे भांडवल घेऊन श्रीविठ्ठलाचा लाभ मिळविला. देश देशांतराला न जाता ऐक्य भावाने जागचे जागीच याचा लाभ झाला.अनेक जन्माच्या खेपा करण्याचे कष्ट सोसले. त्यामुळे चार वेदाने वर्णन केलेले परमात्मस्वरुप ते माझे मुद्दल उरले. ते मुद्दल परमात्म्याने मला देऊन अनेक प्रकारचे देह घेण्याचा प्रकार फेडला. त्यामुळे मी दोन्ही कुळांत उर्तीर्ण झालो. चारी, वेदाची साक्ष मनांत घेऊन मी व्यवहार खंडून टाकला असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *