ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.348

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३४८

आकाशाचा शेंडा कमळ निराळे । त्यासी चार दळे शोभताती ॥१॥ औट हात एक अंगुष्ट दुसरें । पूर्वार्ध मसुरे प्रमाण हें ॥२॥ रक्त श्वेत शाम नीळवर्ण आहे । पीत केशर हे माजी तेथें ॥३॥ तयाचा मकरंद स्वरूप तें शुद्ध । ब्रह्मांदिकां बोध हाची जाला ॥४॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ति प्रसादें । निजरुप गोविंदें जनी पाहतां ॥५॥

अर्थ:-

आकाशातील सृष्टीच्या अगदी शेवटचे जीवरुप शेड्याचे कमळ आहे. त्या जीवरुप कमळाच्या स्जुल, सुक्ष्म, कारण व महाकारण या चार देहरुपी पाकळ्या आहेत. यातील एक पाकळी ही साडेतीन हात आहे. दुसरी पाकळी अंगठ्या येवढी आहे तर तिसरी पाकळी अर्ध्या पेरायेवढी असुन चौथा महाकारण देह मसुरा यैवढा आहे. पाकळ्यांचा रंग तांबडा, पांढरा,काळा, व निळा आहे.त्यात पिवळ केशर आहेत. आनंद हा त्याचा सुगंध आहे व ब्रह्मरस हा मध आहे. असा बोध ब्रह्मादिकाना केला आहे. निवृत्तिनाथांच्या कृपेने त्या निजरुपाचा अनुभव येतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *