दृष्टांत 5 कोण बदलले? काळ-वेळ, सृष्टी की माणूस !

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🌻काय बदलले आहे ? असे विचारल्यावर नेहमी ऐकिवात येते कि, जग बदलत आहे”, पण जरा विचार करा, नेमके काय बदलले आहे जगात…!!!*🌻🙏


आजपर्यंत मिरचीने तिखटपणा नाही सोडला.., तर आंब्याने गोडपणा नाही सोडला…!!!
वृक्षांच्या पानांनी हिरवेपणा नाही सोडला…., तर वृक्षांनी सावली देणे नाही सोडले…!!!
सुर्याने तळपणे नाही सोडले.., तर चंद्राने शीतलता नाही सोडली…!!!


फुलाने सुगंध नाही सोडला.., तर वा-याने वाहाणे नाही सोडले…!!!
नदीने आपला मार्ग नाही बदलला.., तर सागराने आपली मर्यादा नाही सोडली…!!!
पक्षांनी विहार करणे नाही सोडले.., निसर्गाने कोमलता नाही सोडली.., ईश्वराने दयाळूपणा नाही सोडला…!!!
मग नेमके बदलले आहे ते काय?, बदलला आहे तो फक्त माणूस.., माणसाने माणूसकी सोडली…!!!


श्रृष्टी त्रेतायुगात अशीच होती. सत्त्ययुगात पण अशीच होती. द्वापार युगातही अशीच होती. आणि आता कलीयुगातही तशीच आहे…!!!
बदलला आहे फक्त केवळ माणूस आणि त्याचे विचार, पण तो मात्र साऱ्या जगाला तो दोष देत असतो…!!!
माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा…!!!


आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की, आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ शकत नाही…!!!
तसेच जग बदललेय म्हणून जगरहाटीला दोष देऊ नका, समाधानी रहा सर्वांचे आभार माना…!!!


आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो…!!!✌
❣स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या…!!!❣
|| जागृत रहा,सतर्क रहा, सुरक्षित रहा||


🌺🌲🙏🌺🌲🙏🌺🌲🙏🌺

दृष्टांत सूची पहा

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 28
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *