१३३, अभंग :- पंडित वाचक जरी जाला पुरता। तरी कृष्णकथा ऐके भावे। :- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्

अभंग क्र.132

पंडित वाचक जरी जाला पुरता ।
तरी कृष्णकथा ऐके भावे ॥१॥
क्षीर तुपा साकरे जालिया भेटी ।
तैसी पडे मिठी गोडपणे ॥धृपद॥
जाणोनिया लाभ घेई हा पदरी ।
गोड गोडावरी सेवी बापा ॥२॥
जाणिवेचे मूळ उपडोनी खोड ।
जरी तुज चाड आहे तुझी ॥३॥
नाना परिमळद्रव्य उपचार ।
अंगी उटी सारचंदनाची ॥४॥
जेविलियाविण शून्य ते शृंगार ।
तैसी गोडी हरीकथेविण ॥५॥
ज्याकारणे वेदश्रुति ही पुराणे ।
तेचि विठ्ठलनाणे तिष्ठे कथे ॥६॥
तुका म्हणे येर दगडाची पेंवे ।
खळखळिचे अवघे मूळ तेथे ॥७॥

अर्थ

तू जगात पंडित अथवा प्रवचन कार झाला असलास तरी कृष्णकथा भक्तीभावाने ऐक . दूध, तूप आणि साखर यांच्या मिश्रण गोड होते प्रमाणे पंडित आणि श्रीकृष्ण कथा असेल तर कथा अधिक मधुर आहे .तुझ्या विद्वत्तेत कृष्णकथा मिसळून ती अधिक मधुर बनेल .तुला जर आपले हित साधायचे असेल तर जाणिवेच्या अहंकाराचे मुळापासून उच्चाटन करुण टाक .देहाच्या शृंगारासाठी सुगंधियुक्त चंदनऊटी उपयुक्त आहे .पण पोट भरले नसेल तर देहशृंगाराचा काही उपयोग नाही, तसे हरिकथेवाचुन विद्वत्ता काहीच कामाची नाही .ज्या प्रमाणे वेद, श्रुती, पुराणे यामध्ये विठ्ठलरूपाची संपत्ती समावली आहे.त्यामुळे त्यांना महत्त्व आहे .तुकाराम महाराज म्हणतात , तसे हरिकथेवाचून पाडित्य म्हणजे फक्त दगडांचे पेव आहे, ते उपसने म्हणजे व्यर्थ श्रमाची खळबळ आहे .

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ गाथा संपूर्ण अभंग सूची

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *