१ सत्य घटना “नीरजा भानोत” एक हवाई सुंदरी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

स्वातंत्र्या नंतर शत्रुत्वाच्या आगीत होरपळत जगणाऱ्या भारत पाकिस्तान या दोन्ही देशा कडून आपल्या मरणाचीही फिकीर न केल्यामुळे गौरवलेली नीरजा भनोत ही एकमेव भारतीय विरांगना होती, जिने 1986 साली स्वतःच्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने 400 जणांचे जीव वाचविले आणि वयाच्या 23 वर्षी शहीद झाली. आज तिची पुण्यतिथी. खरंतर महिला सक्षमीकरणासाठी चळवळ करणाऱ्या स्त्री संघटनानी तरी तिची आठवण ठेवावयास हवी होती.

विमानप्रवाससेविका म्हणजेच एअर हाॅस्टेस म्हणून काम करणाऱ्या “नीरजा भानोत” यांनी विमानअपहरण घटनेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांचा जीव वाचण्याच्या प्रयत्नात बलिदान दिले. नीरजा यांच्या शौर्याला कडक सॅल्युट ! 🙏

नीरजा भनोत ही हरीश भनोत या हिन्दुस्थान टाइम्स मध्ये असणाऱ्या पत्रकाराची मुलगी आणि Pan Am 73 या एयरलाइंस कंपनी मध्ये सीनियर पर्सर म्हणून काम करणारी मुलगी .

5 सप्टेम्बर 1986 मध्ये पाकिस्तान मधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अश्या जाणाऱ्या Pan Am 73 एयरलाइंस च्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले. त्या विमानात 400 प्रवासी होते. निरजा सुद्धा याच विमानात होती. अतिरेक्यांना ते विमान इस्राइल मधल्या कोणत्या तरी इमारतीला धड़कावयाचे होते .

विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेवुन जाऊ शकत नव्हते. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलट ची मागणी केली. पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाश्यांना मारायची धमकी दिली. त्यांनी निरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले. त्यातून त्यांना अमेरिकन प्रवाश्यांना निवडून मारायची धमकी देवून पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर

दबाव टाकू इच्छित होते .

निरजाने पासपोर्ट गोळा केले, पण शिताफीने त्यातील अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले. त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाश्याला मारायची धमकी देवून पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण निरिजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाश्याचे प्राण वाचविले.

निरजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल. या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे निरजाने ठरविले. त्याप्रमाणे तिने प्लॅनिंग सुरु केले. तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजा बद्दल माहिती देणारी पत्रक प्रवाश्यां पर्यंत पोहोचविले. निरजाने जसा विचार केला होता तसेच घडले. थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्ण पणे अंधार पसरला. या परिस्थितीचा फायदा घेवून निरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाश्यांनी देखील पटापट विमाना बाहेर उड्या मारल्या.

अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला. काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले. सर्व प्रवासी विमानातून बाहेर पड़ेपर्यंत निरजा विमानात थांबली होती. आता ती विमानातून बाहेर पडणार इतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. एवढ्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते. त्यांनी त्या चार अतिरेक्यां पैकी तीन जणांना मारून टाकले.

निरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती तेवढ्यात तो चौथा अतिरेकी निरजाच्या समोर आला. निरजानी त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या. त्यातच तिचा अंत झाला. 17 तास अतिरेक्यांशी झुंजत चारशे प्रवाश्यांना वाचवून निरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देवून गेला.

निरजाने वाचविलेल्या त्या लहान मुलां पैकी एक जण मोठा झाल्यावर वैमानिक झाला. तो त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला की माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर निराजाचा हक्क आहे.

भारताने निरजाला अशोक चक्र हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून सन्मानित केले.

पाकिस्तानने तमगा-ए-इन्सानियत हा सर्वोच्च पुरस्कार दिला.

अमेरिकेने जस्टिस फॉर विक्टीम ऑफ क्राइम ॲवाॅर्ड हा वीरता पुरस्कार देवून सन्मानित केले.
(संपादन – निलिमा जोरवर)

आपल्या असीम त्यागाने मानवतेला एका विशिष्ट उंचीवर नेणाऱ्या नीरजा भनोत या विरांगनेला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

सत्य जे अंतरंगात उतरत

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *