ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.946

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके घोंगडी  अभंग ९४६

निरालंब घोंगडें अद्वैत पेठे । तेथ एक भेटे रूपेंवीणें ॥१॥
हिरोनि घेतलें हिरोनि घेतलें । मज पैं दिधलें दोषेंवीण ॥२॥
रखुमादेविवरें कामाण केलें । अपकारेंविण उघडें नागविलें ॥३॥

अर्थ:-
निरालंबाच्या ठिकाणी एक अद्वैत पेठ आहे. तेथे अमोलिक एक रूपरहित घोंगडे असून ते मला पंढरीस मिळाले. माझे सर्वस्व हरण करून घेऊन कोणताही उद्देश न ठेवता ते घोंगडे मला दिले. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांनी हे उत्तम कमविलेले घोंगडे मला दिले खरे पण कांही एक अपकार न करिता माझी अनात्मभावापासून नागवण केली.असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *