ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.623

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६२३

जनीं वनीं हरि आहे निरंतरीं । बोलिली वैखरी व्यासमुखें ॥१॥ जगजीव ईश्वर क्षरला चराचर । लक्षालक्ष पार अलिप्तपणें ॥२॥ चहूं देहां ग्रासी व्याला तत्त्वे तत्त्वेसी । हरि वैरांटेसी एक वृक्ष ॥३॥ ज्ञानदेवो म्हणे वृक्षही वृक्ष न होणें । असोनी नसणे सुमनी जैसें ॥४॥

अर्थ:-

भगवान व्यासांनी श्रीहरि सर्वत्र जनी वनी भरला आहे. अशी त्याची व्याप्ती सांगितली आहे. तो श्रीहरिच जीव व चराचरात्मक जगत बनला आहे. इतके असनही तो सर्वाहून अलिप्त आहे. म्हणून लक्षणेनेही त्याचे ज्ञान होत नाही. कारण जो कोणत्याही लक्षणेचे लक्ष होत नाही. जगताचे प्रतिपादन करणारे चारी वेद त्याचे ठिकाणी लय पावतात. असा जो तोच ही सर्व जगताची विराट रुपे व्याला असा वेकुंठातील परमात्मा एक वृक्ष आहे असे समजावे.पण तो खऱ्या दृष्टीने वृक्ष झाला नाही. सुमनी म्हणजे विचारयुक्त मनाने विचार केला तर तो वृक्ष वस्तुतः सत्यरूपाने नसून इंद्रिय किंवा अंतःकरण यास विषय होत नाही. म्हणून तो नाही असे मात्र म्हणता येणार नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *