ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.322

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३२२

निर्गुणाची वार्ता सगुणी मांडिली । सगुण निर्गुण दोन्ही एकरूपा आली ॥ सगुण नव्हे ते निर्गुण नव्हे । गुरुमुखें चोजवें जाणितलें पां ॥ रखुमादेविवरु साकारू निराकरु नव्हे । कांहीं नव्होनि होये तोचि बाईये वो ॥

अर्थ:-

निर्गुणाचा विचार सगुणाच्या ठिकाणी करू लागले असता समानाधी करणाने सगुण निर्गुण हे दोन्ही एकच ठरतात. वास्तविक विचार केला असता ते सगुण ही नव्हे व निर्गुणही नव्हे. ते दोन्ही धर्म उपाधीच्या भावाभावामुळे आलेले आहेत. गुरूमुखाने श्रवण करुन जर उपाधिचा निरास केला तर रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल ते सगुण निर्गुण या दोन्ही धर्मविरहित शुद्ध व सच्चिदानंद रूप आहे. असा निश्चय होईल.असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *