आपल्या सूचना, व काही धार्मिक माहिती असल्यास 9422938199 या whatsaap नंबरवर पाठवावी.
📕 दैनिक पंचांग
बुधवार दि. ४ नोव्हें २०२०
( दृक् प्रत्ययतुल्य ग्रहगणित = आधुनिक
संशोधनात्मक सूक्ष्म गणित पध्दतीचे पंचांग )
💧 सर्व वेळा दाते पंचांगा नुसार 💧
📘शालिवाहन शके १९४२,
शार्वरी नाम संवत्सर, विक्रम संवत् २०७६,
दक्षिणायन, शरद ऋतु : रवि – स्वाती-४ नक्षत्रात
, तुला राशीत : गुरु – धनु राशीत : शुक्र – कन्या राशीत : शनि – मकर राशीत.
🩸 निज आश्विन मास कृष्ण ( वद्य ) पक्ष🩸
🔘 (१) तिथि : – चतुर्थी – २९-१५ प. नं. पंचमी.
🔘 (२) नक्षत्र : – मृगशीर्ष – २८-५१ प. नं. आर्द्रा
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (३) योग : – शिव – अहोरात्र.
🔘 (४) करण : – बव – १६-२३ प. नं. बालव – २९-१५ प. नं. कौलव.
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
( पुढील क्र. ५-६-७-८-९ मुंबई मानाचे )
🔘 (५) दिनमान : – ११ ता. २१ मि.
🔘 (६) सूर्योदय : – ०६-४२.
🔘 (७) सूर्यास्त : – १८-०३.
🔘 (८) रात्रिमान : – १२ ता. ३९ मि.
⭕ (९) राहुकाल : – १२-२३ ते १३-४८.♦ मंगल व धार्मिक कार्यांस वर्ज्य नाही.♦
🔘 (१०) ‘मकर’स्थ शनीची ‘सूक्ष्म’ साडेसाती
🚨 (अ) जन्मस्थ चंद्र : ‘वृश्चिक’ राशि १७ अंश १४ कला ०० विकला असणाऱ्यांची साडेसाती संपत आहे. (ब) ‘कुंभ’ राशि १७ अंश १४ कला ०० विकला असणाऱ्यांची प्रारंभ होत आहे.
(क) ‘धनु’ आणि ‘मकर’ राशीस ‘सूक्ष्म’ साडेसाती चालू आहे.
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (११) चंद्र राशिप्रवेश : – वृषभ (१५-४३ प. नं. मिथुन )
🔥 (१२) अग्नी पृथ्वीवर (भूमीवर) : – २९-१५ प. ‘आहे’.
💥 (१३) आहुतीपात : – २८-५१ प. मंगळ (‘अशुभ’) नं. गुरु (‘शुभ,) ग्रह मुखी : पुढील सूर्योदय वेळेपर्यत.
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🚫 (१४) शुभाशुभ दिवस : – ‘शुभ’ दिवस.
📙 (१५) (१६) (१७) ‘निज आश्विन’ मासातील अ) ‘१९’ प्रकारच्या कार्यांसाठी मुहूर्तांच्या तारखा ब) संभ्रमीत ‘प्रति सांवत्सरिक श्राध्द’ तिथींच्या तारखा क) ‘स्वाती’ नक्षत्र – पर्जन्य विचार : विस्तार भयास्तव प्रस्तुत पंचांगात समाविष्ट न करता स्वतंत्र्यपणे प्रेषित केले आहेत
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
⛔ (१८) दिन-विशेषाचा शास्त्रार्थ : –
🏮 उपोषण / उपवासा साठी साबुदाणा, चरबीयुक्त कृत्रिम तूप व शेंगदाणा कूट खाणे शास्त्राने निषिध्द मानले आहेत. 🏮
1️⃣ संकष्ट चतुर्थी : मुंबई चंद्रोदय २०-४९ वा., करक चतुर्थी ♦️ शास्त्रार्थ ◾ प्रत्येक चांद्रमासातील चंद्रोदय व्यापिनी कृष्ण चतुर्थी ला ‘संकष्ट चतुर्थी’ म्हणतात.
🚩 मंगळवारी संकष्ट चतुर्थी असता अंगारक चतुर्थी योग होतो. 🚩
🚩 आश्विन कृष्ण चतुर्थी ला करक चतुर्थी म्हणतात. 🚩
ह्या दिवशी संकटनाशनासाठी श्रीगणेशाची उपासना केली जाते. दिवसा उपोषण करुन रात्री चंद्रोदय झाल्यावर भोजन करावे.
🩸 वर्षभरातील २४ चतुर्थ्यां ची अन्वर्थक संज्ञा (नांवे) व त्या विषयक पौराणिक कथा “मत्स्य व गणेश भागवत, मेरुकल्पाचा तृतीया स्तंभ, रुद्रयामल ग्रंथातील गणेश तंत्र” आदी ग्रंथांत पाहावी.
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
2️⃣ घबाड २८-५१ प.♦ शास्त्रार्थ ◾ वर्तमान सूर्यनक्षत्र ‘स्वाती’ पासून तत्कालीन चंद्रनक्षत्र ‘मृगशीर्ष’ पर्यंचा संख्यांक घेऊन, त्याची तिप्पट करुन त्यांत शुक्ल प्रतिपदे पासून वर्तमान तिथि ‘कृष्ण चतुर्थी‘ पर्यंतचा संख्यांक मिळवावा. नंतर त्या बेरजेस ७ नी भागावे. बाकी ३ उरेल तर घबाड योग आहे असे समजावे. तिथि ‘कृष्ण चतुर्थी’ व चंद्रनक्षत्र ‘मृगशीर्ष’ ह्यांचा संयोग असेपर्यंत हा घबाड योग राहिल.
🩸 शुभ योग, प्रयाणास शुभ, लाभदायक कामे करावीत.
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🟢 शब्दार्थ : प. म्हणजे पर्यंत व नं. म्हणजे त्यानंतरचे ( पुढील ) तिथ्यादि इष्ट वाराच्या समाप्तीपर्यंतचे. ( पुढील सूर्योदयापर्यंतचे. )
🛑 प्रेषक :
दिलीपकुमार अनंत रेवणकर
उल्हासनगर, जि. – ठाणें.
w/a – 9175434799, m – 8080993173,
face book.
e-mail : dilipkumar.revankar@gmail.com
🌹ll अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll 🌹
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
आपल्या सूचना, व काही धार्मिक माहिती असल्यास 9422938199 या whatsaap नंबरवर पाठवावी.
