9 डिसें.२०२०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇



दैनिक पंचांग – मंगळवार दि.9 डिसें.२०२०
( दृक् प्रत्ययतुल्य ग्रहगणित = आधुनिक
संशोधनात्मक सूक्ष्म गणित पध्दतीचे पंचांग )
💧 सर्व वेळा दाते पंचांगा नुसार 💧
📘शालिवाहन शके १९४२, शार्वरी नाम संवत्सर, विक्रम संवत् २०७७, दक्षिणायन, शरद् ऋतु : रवि – जेष्ठा-३ नक्षत्रात, वृश्चिक राशीत : गुरु – मकर राशीत : शुक्र – तुला राशीत : शनि – मकर राशीत.
🩸 कार्तिक मास कृष्ण ( वद्य ) पक्ष🩸
🔘 (१) तिथि : – नवमी – १५-१८ प. नं. दशमी. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (२) नक्षत्र : – उत्तराफाल्गुनी – १२-३३ प. नं. हस्त ♦️शास्त्रार्थ ◾ १) उत्तराफाल्गुनी – १२-३३ प. : त्रिपाद नक्षत्र : पूर्ण काल : मरण झाल्यास त्रिपाद शांती चे व असल्यास पुत्तल विधी चे नक्षत्र.
🩸 त्रिपाद नक्षत्रे : – कृत्तिका, पुनर्वसु, उत्तराफाल्गुनी, विशाखा, उत्तराषाढा ही ५ नक्षत्रे होत. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (३) योग : – आयुष्मान – २२-४३ प. नं. सौभाग्य.
🔘 (४) करण : – गरज – १५-१८ प. नं. वणिज – २६-०८ प. नं. विष्टि ♦️शास्त्रार्थ ◾ विष्टि (भद्रा) : २६-०८ नं. : १) उपरोक्त कालावधीच शुभ व मंगल कार्यांस वर्ज्य. २) उपरोक्त कालावधीतच जन्म झाल्यास रुद्राभिषेक जनन शांति करावी.
दिलीपकुमार अनंत रेवणकर.
( पुढील क्र. ५-६-७-८-९ ‘मुंबई’ मानाचे )
🔘 (५) दिनमान : – १० ता. ५८ मि.
🔘 (६) सूर्योदय : – ०७-०२.
🔘 (७) सूर्यास्त : – १८-००.
🔘 (८) रात्रिमान : – १३ ता. ०२ मि.
⭕ (९) राहुकाल : – १२-०१ ते १३-३१.
♦ मंगल व धार्मिक कार्यांस वर्ज्य नाही.♦
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (१०) ‘मकर’ स्थ शनीची ‘सूक्ष्म’ साडेसाती :
🚨 (अ) जन्म स्थ चंद्र : ‘वृश्चिक’ राशि २० अंश ०१ कला ०० विकला असणाऱ्यांची साडेसाती संपत आहे. (ब) ‘कुंभ’ राशि २० अंश ०१ कला ०० विकला असणाऱ्यांची प्रारंभ होत आहे.
(क) ‘धनु’ आणि ‘मकर’ राशीस ‘सूक्ष्म’ साडेसाती चालू आहे. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (११) चंद्र राशिप्रवेश : – कन्या
🔥 (१२) अग्नी पृथ्वीवर (भूमीवर) : – ‘नाही’.
💥 (१३) आहुतीपात : – राहु (‘अशुभ’) ग्रह मुखी : पुढील सूर्योदय वेळेपर्यत.
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🚫 (१४) शुभाशुभ दिवस : – ‘उत्तम’ दिवस.
📙 (१५) (१६) ‘कार्तिक’ मासातील (अ) ‘१९’ प्रकारच्या कार्यांसाठी मुहूर्तांच्या तारखा (ब) संभ्रमीत ‘प्रति सांवत्सरिक श्राध्द’ तिथींच्या तारखा : विस्तार नभयास्तव प्रस्तुत पंचांगात समाविष्ट न करता, ते स्वतंत्र्यपणे प्रेषित केले आहेत. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
⛔ (१७) दिन-विशेषाचा शास्त्रार्थ : –
🏮 उपोषण/उपवासा साठी साबुदाणा, चरबीयुक्त कृत्रिम तूप व शेंगदाणा कूट खाणे शास्त्राने निषिद्ध मानले आहे. 🏮
1️⃣ घबाड योग १५-१८ नं. ♦शास्त्रार्थ ◾वर्तमान सूर्यनक्षत्र “जेष्ठा” पासून तत्कालीन चंद्रनक्षत्र ”हस्त” पर्यंचा संख्यांक घेऊन, त्याची तिप्पट करुन त्यांत शुक्ल प्रतिपदे पासून वर्तमान तिथि ”कृष्ण दशमी” पर्यंतचा संख्यांक मिळवावा. नंतर त्या बेरजेस ७ नी भागावे. बाकी ३ उरेल तर घबाड योग आहे असे समजावे. तिथि ”कृष्ण दशमी” व चंद्रनक्षत्र ”हस्त” ह्यांचा संयोग असेपर्यंत हा घबाड योग राहिल.
🩸 “शुभ” योग, प्रयाणास शुभ, लाभदायक कामे करावीत.
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
2️⃣ भद्रा २६-०८ नं.♦उपरोक्त क्रमांक 🔘 (४) मधील माहिती पाहावी.
3️⃣ नवमी-दशमी श्राध्द ♦️शास्त्रार्थ ◾ ह्या दोनही तिथि आज रोजी ‘अपराह्णकाली’ ( दिनमानाच्या एकूण ५ समान भागांपैकी ४ थ्या भागाचा कालावधि : सामान्यत: मध्यम मानाने दुपारी १ll ते ४ दरम्यानचा कालावधि ) जास्ती-व्याप्ती ची असल्याने ह्या दोनही तिथींचे प्रतिसांवत्सरिक श्राध्द आज रोजीच करावेत.
🩸 एखाद्या दिवशी ( त्या दिवशी अपराह्ण काळात श्राद्धतिथि असते म्हणून ) सूर्योदयापासून दुपारी १२ वाजेपर्यंत ती श्राध्दतिथि नसताना सुद्धा, सूर्योदयापासून दुपारी ३ वाजेपर्यंत ‘कोणत्याही वेळी’ श्राध्दकर्म करतां येते. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🟢 शब्दार्थ : प. म्हणजे पर्यंत व नं. म्हणजे त्यानंतरचे (पुढील) तिथ्यादि इष्ट वाराच्या समाप्ती वेळेपर्यंतचे. (पुढील सूर्योदय वेळेपर्यंतचे.)
🛑 प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर ©
उल्हासनगर, जि. – ठाणें.
w/a – 9175434799, m – 8080993173,
face book,
e-mail :
dilipkumar.revankar@gmail.com
🌹ll अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll 🌹

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading