दृष्टांत 115 संताचे पायी हा माझा विश्वास

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇


…….. एकदा एक अतिशय हुशार चोर एका श्रीमंत माणसाच्या बंगल्यावर चोरी करण्यासाठी गेला……..
त्या दिवशी एक संत महात्मे त्या ठिकाणी भागवत कथा वाचण्यासाठी आले होते……. ते परमेश्वरांच्या लिळांचे भावपूर्वक वाचन करीत होते…….. घरातील मंडळी अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते…….. चोर मागच्या दारातुन बंगल्यात शिरला त्याने पाहीले सर्व भागवत ऐकण्यात गुंग आहेत……… त्याच वेळेस संत महात्मे श्रीकृष्णच्या मुर्तिचे वर्णन करीत होते……. ते वर्णन असे सुरू होते की, यशोदा माता आणि रोहीनी माता दररोज श्रीकृष्ण आणि बलरामांना सोन्याचे अलंकार घालत असत…….

संत श्रीकृष्णभगवंताच्या रत्नाच्या हारांचे व अलंकाराचे किती अनमोल आहेत. मृत्यूलोकात तसे अलंकार कुठेच नाहीत असे भक्तिभावणेने वर्णन करीत होते…….. चोराने कानोसा घेतला आणि त्या अलंकाराचे वर्णन ऐकले…… चोराचे लक्ष चोरीवरून निघाले आणि तो विचार करू लागला की, इतके अमूल्य रत्न अलंकार ज्याच्या कडे आहेत त्या दोन्ही भावांचा पत्ता या साधुला मी विचारतो…….. श्रीकृष्ण आणि बलराम कोणत्या ठिकाणी गाई चारायला जातात हे विचारू आणि त्यांचे रत्नाच्या माळा, अलंकार हिसकावून घेऊ …….. इतकं द्रव्य आल्याजवळ आल्यावर आपणखुप श्रीमंत होऊन जाऊ की आपल्याला चोरी करण्याची गरजच पडणार नाही…….. असा विचार करून तो घरातुन बाहेर पडला व बंगल्याच्या थोड दुर जाऊन साधुचे प्रवचन संपण्याची वाट पाहू लागला…….

श्रीकृष्ण भगवंताची लिळा पाहा, त्या चोराने भागवत आणि भक्तिचे प्रसंग या आधी कधीच ऐकले नव्हते…….. कारण चोर तो चोरच.!!! तो दुर्व्यसनी लोकांच्या संगतीत राहणार त्याला संत समागम माहीतच नव्हता………. चोरी करणे लुटमार करणे दरोडे घालणे हेच त्याला माहीत होते…….

आता तो चोर सुनसान रस्त्यावर उभा राहून साधु येण्याची वाट पाहू लागला…….. आणि कधी कधी तो साधु येईल आणि मी त्या दोन्ही भावांचा पत्ता विचारेन. असे त्याला झाले……

तिकडे प्रवचन झाले आणि संत महात्मे बंगल्याच्या बाहेर आले व रस्त्याने आपल्या पर्णकुटीत जायला निघाले……. साधु समोरून येत असल्याचे पाहून चोराने चाकू काढला आणि साधु समोर जाऊन उभा राहीला……… चाकुचा धाक दाखवत साधुला विचारले की, ” तुम्ही ज्या दोन भावांबद्दल बंगल्यात सांगत होते, त्यांचा पत्ता मला सांगा. नाहीतर यमलोकी जायला तयार व्हा. “……… संत महात्म्यांना भीती वाटली पण त्यांनी उत्तर दिले की, ” अरे बाबा..!! मी भागवत कथा सांगत होतो.”……… चोर म्हणाला, ” मला फसवु नका.”
त्या दोन्ही भावांच्या दागीन्यांची किंमत खुप आहे. ते अमूल्य रत्नांनी बनलेले आहेत असं तुम्ही सांगत होता. मला त्यांचा पत्ता दया………

संत त्या चोराला समजावुन सांगु इच्छित होते. पण तो ऐकेना. मग संतांनी विचार केला की, या द्रव्यलुद्ध, अविवेकी मुर्ख माणसाला ज्ञानाच्या या गोष्टी कळणार नाहीत………. याच्या मनात फक्त सोने अलंकार, सोने याचा विचार आहे आणि संतांना त्या चाकुचेही भय वाटत होते……… म्हणून आपला जीव वाचविण्यासाठी संत म्हणाले, ” वृंदावनात जा तिथे दोन्ही भाऊ सकाळी सकाळी गाई चारायला येतात.”…… तिथेच तुला ते भेटतील. ऐवढे बोलून तेथुन संत माहात्म्यांनी काढता पाय घेतला…….. जाता जाता चोरानी त्यांना म्हटले की, ” त्या दागिन्याचा अर्धा हिस्सा मी तुम्हाला देईन.”……..

चोर वृंदावनाकडे जायला निघाला. भराभर चालत त्याने वृंदावन गाठले……. संध्याकाळच्या सुमारास तो पोहचला होता. त्याने तेथील ग्रामस्थ लोकांना विचारले की, कृष्ण आणि बलराम गाई चारण्यासाठी कुठे येतात. लोकांनीही अगदी निर्मळ मनाने ती जागा दाखविली……..
चोर तिथे वृंदावनात गेला व एका झाडावर जाऊन बसला. मनात फक्त श्रीकृष्ण भगवंताचा विचार होता. नकळत का होईना श्रीकृष्ण नामाचा जाप सुरू होता……… रात्रभर त्याला झोप आली नाही. पूर्ण रात्रभर त्याला तहान भुक कशाचीच पर्वा नव्हती…….. त्याच्या मनात एकच उत्सुकता होती.
कधी त्या दोन्ही भावांचे अलंकार हिसकावून घेईन…….

तो मोठ्या उत्कंटतेने सुर्योदयाची वाट पाहत होता……… रस्त्याकडे पाहायचा. नकळत श्रीकृष्ण श्रीकृष्ण नामाचा उच्चार त्याच्या मुखातुन निघत होता…….. आणि मनातही तेच नाम जपले जात होते……..
अरुणोदय झाला चोराची उत्कंठा अधिकच वाढली. थोड्याच वेळात त्याने एक अलौकिक असा प्रकाश समोरून येतांना पाहीला……… निरखुन पाहिल्यावर दोन मुले येतांना दिसली. तो त्या मुलांना एकटक पाहु लागला. याआधी इतके सुंदर मनमोहक रूप त्याने कधीच पाहीले नव्हते…….. मी कोण, काय, कशासाठी इथे आलो हे सर्व विसरला. श्रीकृष्ण आणि बलराम जवळ आल्यावर त्याला आठवले की, अरे आपण तर चोर आहोत आणि या दोघांचेही अलंकार घेण्यासाठीच येथे आलेले आहोत………. आणि त्याने श्रीकृष्ण व बलराम यांना धमकवायला सुरूवात केली……… स्वतः पुढे होऊन सर्व दागीने काढायला लागला तेंव्हा भगवंतांनी स्मित हास्य करून त्याला दागीने नेण्यास परवानगी दिली……… चोराला परमेश्वराच्या अंगाचा अलौकिक स्पर्श अतिशय सुखावह वाटला……. अलंकार घेऊन तो तेथून लगेच पसार झाला आणि त्या श्रीमंत माणसाच्या बंगल्याजवळ येऊन साधु येण्याची वाट पाहु लागला. साधु समोरून येताच त्याने म्हटले,
” त्या दोन्ही भावांचे दागीने मी आणले आहेत तुम्ही आपला वाटा घ्या.”

साधु खुप अस्वस्थ झाले आणि त्याला म्हणाले, ” तु कोणत्या मुलाचे दागीने आणले.? ” चोर म्हणाला, ” विसरलात काय. मी तुम्हाला कृष्ण आणि बलरामाचा पत्ता विचारला होता…… तुम्ही म्हणाले वृंदावनात जा तिथे गेलो आणि त्यांचे नाव ही विचारले आणि त्यांच्याकडून हे दागीने आणले……….
संत खुप आश्चर्यचकित झाले आणि त्याला म्हणाले, ” मला त्या मुलांना भेटायचे आहे तिथे घेऊन चल. ” चोर म्हणाला चला आणि दोघेही वृंदावनात पोहचले…….. तेथे कृष्ण आणि बलराम एका वृक्षाखाली बसलेले दिसले. चोर म्हणाला, ते बघा तिकडे आहेत… पण साधुला काहीच दिसेना. फक्त चोरालाच दर्शन होत होते……. साधुला आणखीणही आश्चर्य वाटले आणि दुःखही वाटले.

चोर श्रीकृष्ण भगवंताला व बळीरामाला म्हणाला, ” तुम्ही या महात्म्यांना का दिसत नाही. तुम्ही त्यांनाही दिसा नाहीतर ते मला लबाड समजतील.”……. त्या चोर भक्ताच्या हट्टापायी महात्म्यांनाही परमेश्वराचे दर्शन झाले……..

साधुच्या डोळ्यातुन अश्रु आले आणि रडायला लागले व म्हणाले,
** हे भगवंता मी अनेक वर्षांपासून भागवत कथा करतो. जन्मभर मी आपलेच स्मरण करत आलो पण अशी कृपा माझ्यावर केली नाही. **
** या चोराला तर फक्त अलंकार पाहीजे होते. याला आपल्या ईश्वरत्वाबद्दल काहीच माहीत नव्हते. मग याला आपण दर्शन का दिले.? **

** ” भगवंत म्हणाले, कारण त्या ऊत्कंठने, ऊत्कंठ भावणेने तु मला कधी बोलावले नाहीस म्हणून.”**

संत महात्मे खुप रडायला लागले,
** ” पुढे भगवंत सांगु लागले की,…. नकळत का होईना त्याचा संताच्या शब्दावर दृढ विश्वास होता. भलेही त्याला माझ्याबद्दल काही माहीत नव्हते.
पण,
** ” मला शोधण्याची ऊत्कंठा त्याच्या अंतकरणात होती. रात्रभर तो माझेच स्मरण करीत होता. **
म्हणून मी त्याला दर्शन दिले.

** तशी ऊत्कंठा तुझ्या अंतकरणात कधीही नव्हती. आताही तुला त्याच्या हट्टामुळेच दर्शन होत आहे **

हे सर्व दृश्य पाहून चोराचे मन परार्वतीत झाले. तो खुप आनंदीत झाला व त्या संताच्या सहवासात श्रीकृष्ण भगवंताचा परमभक्त झाला……..

म्हणून,
…..** संतांच्या शब्दावर विश्वास ठेवावा. संसाररूपी सागरातुन तरून जाण्यासाठी संतांचे शब्द हीच नाव आहे. **..

…… असो.
…….. दंडवत प्रणाम 🙏🙏

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 20
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *