दृष्टांत 6 कर्मणा गहणो गती:

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

-*                                                                            *सकाळी पंधरा मिनिटे पूजा करून टाकतात. आणि दिवसभर मौजमजा. संचितातले पुण्य भसाभस संपत जाते. काही पापही हातून घडत असते.  पण मनात सतत अहंकार असतो की मी सकाळी पूजा केली आहे. एक हजार रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का?*
®️ महान तपश्चर्या केलेल्या कालीभक्त परमहंसांना कॅन्सर झाला.


®️ विवेकानंदांना मधुमेहाने ग्रासले.
®️ व-हाडचे महान संत गुलाबराव महाराजांना अंधत्व आले.
®️ सुरदासही आंधळे होते.
®️ मुक्तेश्वर मुके होते.
®️ कुर्मदास पांगळे होते.
 ®️ चोखोबारायांचा मृत्यु भिंत आंगावर पडल्याने झाला.


®️ तुकोबारायांचा सर्व संसार दानादिन झाला.
®️ ज्ञानोबारायांच्या आई वडीलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागले.
®️ जन्मभर श्रीकृष्णांसाठी वेड्या झालेल्या मीराबाईला खूप छळ सोसून शेवटी विषाचा प्याला घ्यावा लागला.
®️ पांचालीला वस्त्रहरणाच्या दिव्यातून जावे लागले.
®️ महान पतिव्रता सीतादेवींना बंधनवासात रहावे लागले आणि अग्निदिव्याला सामोरे जावे लागले.


®️ श्री रामप्रभूंना वनवास भोगावा लागला.
®️ प्रत्यक्ष श्रीकृष्णांना स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप सहन करावा लागला. 
®️ विश्वामित्रांची तपश्चर्या भंग पावली.
®️ पैशाची टांकसाळ घरात असताना ह्या महान पुण्यवान जीवांना दारिद्र्य,दु:ख भोगावे लागले इतकी कर्माची गति गहन असते तर आपल्या टिचभर पुण्याचा डांगोरा पिटणे हास्यास्पद नाही का?


🔰 “मी एवढे देवाचे करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का” असे रडगाणे गाणा-या अज्ञ जीवांनी वरील उदाहरणे वाचून निमुटपणे प्रेमाने उपासना करीत रहावे व परमेश्वराच्या अचुक न्यायदानावर विश्वास ठेवावा. त्याच्या न्यायालयात कधीही गफलत होत नाही.
🎯 म्हणून पुण्याची गणना करुन स्वतःचा टेंभा मिरवू नका .
म्हणून हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी._
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏾

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 28

दृष्टांत सूची पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *