उपकुळ

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

सर्व आडनांवे-surname- list यादी पहा

◆ कुलदैवत म्हणजे काय ? ते वेगवेगळे का ?मानवी आयुष्यातील स्थान ◆◆

प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न, मुंज, वास्तु, मंगलकार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो

कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय?
आपले कुलदैवत कोठे आहे?
त्याचे महत्व काय?
कुलदैवतासंबंधी आपल काय कर्तव्य आहे?

हे सर्व प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात. विभक्त्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात आणि घरात एखादी समस्या उध्दभवली की धावपळ सुरु होते.

आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते.

◆ कुलदेवता या शब्दाचा अर्थ !

‘कुलदेवता’ हा शब्द ‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्या वेळी पुरुष देवता असते, त्या वेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्री देवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते.

कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात आहेत.

◆ कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व

ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की, साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा.

◆ कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे ?

मूळ स्वरुपातील दैवते : ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया
विष्णूची अवतार रुपातील दैवते : नृसिंह, राम, कृष्ण, परशुराम
शंकराची अवतार रुपातील दैवते : कालभैरव, खंडोबा, मारुती
आदिमायेची अवतार रुपातील दैवते : सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, दुर्गा, चंडी, काली
शंकराच्या गणांचा मुख्य अधिपती, तसेच आरंभ पूजनाची देवता – गणेश
देवांचा सेनापती : कार्तिकेय (दक्षिण भारतात याला महत्त्व आहे. अय्यप्पा म्हणतात)
वैदिक देवता : इंद्र, अग्नी, वरुण, सूर्य, उषा (यातील सूर्य व अग्नी वगळता इतर दैवतांची उपासना आज प्रचलित नाही )

◆ नोट: कुलदेवी/देवता माहीती नसल्यास वरील पैकी ज्या देवावर भक्ति आहेत त्यांची उपासना करावी.

या अजुन ग्रामदैवत, कुलदैवत, इष्टदैवत वगैरे दैवतांचे प्रकार आहेत. (आराध्यदैवत असाही एक प्रकार असावा पण त्यात आणि इष्टदैवतात नेमका फरक कोणता ते माहित नाही.)

ग्रामदैवत ही संपूर्ण गावाचे दैवत, कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे, आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते.

एखाद्याचे कुलदैवत कोणते हे कसे ठरवावे? (हे काहिसे आधी कोंबडी की अंडे सारखे झाले ना?) कुळावरून कुलदैवत व कुलदैवतावरून कुळ ठरवणे

बहुदा कुळाचे एखादे दैवत असावे. कदाचित काही नातलग कुटुंबांचा एखाद्या गावाशी संबंध असावा. जिथे वस्ती केली, तिथे एक देऊळ बांधणे

कुळ म्हणजे कुटुंबकबिला वाढला की म्हणत असावेत असा आपला एक अंदाज करते. अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असणे शक्य असू शकेल. मग जरी लोक स्थलांतरित झाले, तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी.

कुळ म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधले गेलेले विस्तृत कुटुंब. (दत्तक विधान अर्थातच यात मान्य आहे. अशी तडजोड आमच्या कुळातील एका फांदीवर पाहिलेली आहे.) बहुधा गोत्र, जाती वगैरेंसारखा लहान गट किंवा टोळी म्हणजे कुळ. एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावतातच असे नाही परंतु कुलदैवत, गाव, जात वगैरे वरून ते स्वतःला एकाच कुळातले मानतात असे वाटते.

कुळाला इंग्रजीत क्लॅन म्हणतात असे वाटते. एकंदरीत काय कुळ म्हणजे एक टोळी यावरून महाभारतयुद्ध हे एक टोळीयुद्ध होते या वचनाची आठवण होते.

आप्त संबंधांमुळे जे एकत्र आले आहेत किंवा एकत्र वास करतात असे एका रक्ताचे व संबंधांचे जे काही लोक असतील त्या सर्वांच्या समूहास कुळ असे म्हणतात.कुळ शब्दाला मराठीत घराणे असा शब्द रूढ आहे. कुळ म्हणजे घराणे ठीक आहे परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे.

सर्व आडनांवे-surname- list यादी पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *